सुज्ञ विद्यार्थी सशक्त समाजाचा कणा आहे .. सुरेश यमगर सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन



श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील ऐक्याची भावना महत्वाची आहे .भारतातील विविध जाती धर्मातील सामंजस्य व एकता  देशाची ताकद आहे .घटनादत्त अधिकार व्यक्तीचे सर्वांगीण जीवन उज्ज्वल करत आहेत. देशातील सुज्ञ विदयार्थी देशाची खरी संपत्ती आहे .त्यामुळे समाज प्रगल्भ बनतो .असे प्रतिपादन     सुरेश निवृत्ती  यमगर   सहाय्यक  पोलीस निरीक्षक श्रीवर्धन  यांनी केले .

   श्रीवर्धन बौद्ध हितकारणी यांच्या तर्फे  गुणवंत विदयार्थी व निवृत्त कर्मचारी यांच्या सत्कार समारंभ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला होता .त्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी वर्गास   सुरेश यमगर यांनी मार्मिक मार्गदर्शन करतांना पुढे असे म्हंटले . सुज्ञ विदयार्थी हा देशाच्या लोकशाही चा कणा आहे .आज आपण समोर अनेक आदर्श आहेत .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संपुर्ण जीवन हे विद्यार्थी वर्गासाठी प्रेरणादायी आहे .अभ्यासाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नियोजन त्यांच्या प्रगल्भ बुद्धीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी दिवसात 21 तास अभ्यासाचा आदर्श आपणां समोर ठेवलेला आहे .बाबासाहेबांचे संपुर्ण जीवन राष्ट्रभक्तीने भारावलेले आहे .त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मी स्वतः अभ्यास केला व त्याची परिणीती म्हणून मी आज पोलीस सेवेत कार्यरत आहे. समाजाच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे .गुणवंत विद्यार्थीना त्यांच्या भावी काळासाठी शुभेच्छा आहेत .असे यमगर यांनी आपल्या मनोगतात सांगितले .सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रदीप पवार होते .कार्यक्रम प्रसंगी श्रीवर्धन बौद्ध हितकारणीचे दिपक शिर्के, एच आर जाधव ,भीमराव जोशी, राजेश्वर पवार, सुभाष येलवे ,प्रदीप तांबे ,दिलीप हेंद्रे , भाविका जोशी ,रमेश साखरे, व श्रीनिवास नागावकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा