श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
वीज, उद्योग व शेती सर्वत्र महागाई चा भडका उडाला आहे .देशातील सर्व सामान्य जनता महागाई मुळे त्रस्त झाली आहे .विद्यमान केंद्र सरकारने तात्काळ महागाई कमी करावी अशा मागणी चे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रीवर्धन तहसीलदार देण्यात आले .
मोर्च्याचे आयोजन सोमजाई मंदिरा ते तहसील कार्यालय असे करण्यात आले .तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.वीज नियामक मंडळाने घरगुती वापराची वीज, उद्योगगासाठी वापरण्यात येणारी वीज, शेती पंपासाठी वापरण्यात येणारी वीज यांची दरवाढ भरमसाठ झाली आहे .इंधन दरवाढ गगनाला भिडली आहे सरकारने या सर्व बाबी गांभीर्याने घ्याव्यात असे निवेदनात म्हटले आहे. मोर्च्यात मोहम्मद मेमन ,नरेंद्र भुसाने जितेंद्र सातनाक ,गणेश पोलेकर, मंगेश पोलेकर ,भावेश मांजरेकर, मोहन वाघे, ऋतुजा भोसले व अविनाश कोळंबेकर आणि इतर पक्ष कार्यकर्ते होते .

Post a Comment