श्रीवर्धन : वार्ताहर
वीज मंडळाने घरगुती व शेतीच्या विजेच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे . तसेच पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे आम्ही शासनाचा निषेध करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या निवेदनात म्हटले आहे श्रीवर्धनची ग्रामदैवत सोमजाई मातेच्या मंदिरापासून तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला होता . तहसील कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे , उपनगराध्यक्ष जितेंद्र सातनाक , अविनाश कोळंबेकर यांची भाषणे झाली . राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष महम्मद मेमन , जिल्हा उपाध्यक्ष डॉ अबु राऊत , युवक जिल्हा उपाध्यक्ष निलेश येलवे तालुका महिला अध्यक्षा नंदा भोसले माजी नगराध्यक्षा दिशा नागवेकर , जिल्हा परिषद सदस्या प्रगती अदावडे , पं . स . सदस्य मंगेश कोमनाक व शंभराहून अधिक महिला व पुरुष कार्यकर्ते मोर्चेत सहभागी झाले होते . त्यानंतर तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment