संजय खांबेटे : प्रतिनिधी म्हसळा
म्हसळा तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस (आय) १ आंबेत, राष्ट्रवादी काँग्रेस ३ खारगाव ( खु ), मेंदडी व मांदाटणे आणि कोळे येथे परिवर्तन आघाडी ( शिवसेना पुरस्कृत) सरपंच निवडून आले आहेत.
माजी मुख्यमंत्री बॅ .ए. आर. अंतुले यांच्या आंबेत ग्रामपंचायतीत शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे पानीपत केले. सरपंचपदी काँग्रेसच्या अफरोजा नाजीम डावरे या निवडून आल्या .९ सदस्य संख्येपैकी शिवसेना ५, काँग्रेस ( आय) ३ व राष्ट्रवादी काँग्रेस १ असे बलाबल आहे. माजी सभापती महादेव पाटील यांच्या खारगाव ( खु) ग्रामपंचायतीवर शिवसेनेची २५ वर्षाची परंपरा मोडत राष्ट्रवादी काँग्रेसने सरपंचपदी वनिता चंद्रशेखर खोत याना विजयी करण्यात यश आले. ७ सदस्य असलेल्या या पंचायतीत शिवसेना ५ व राष्ट्रवादी काँग्रेस २ असे पक्षीय बलावल आहे.कोळे ग्रामपंचायतीवर परिवर्तन आघाडी ( शिवसेना पुरस्कृत) सरपंच देवका गणेश जाधव या सरपंच पदी निवडून आल्या आहेत .७ सदस्य संख्या पैकी परीवर्तन आघाडी ५ , २ पंचक्रोषी आघाडी २ (N.C.P. पुरस्कृत) असे पक्षीय बलाबल आहे. बिनविरोध झालेल्या मांदाटणे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंचपदी चंद्रकांत पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे . ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ८ व १ भाजप असे संख्याबळ आहे. मेंदडी ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री रवींद्र कांबळे या निवडून आल्या , ११ सदस्य संख्ये पैकी राष्ट्रवादी काँग्रेस ९ व शिवसेना १ संख्याबळ आहे. खारगाव खुर्द ग्रामपंचायतीत सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनिता खोत या केवळ एक मताने निवडून आल्यामुळे शिवसेनेने री काँऊटींग ची मागणी केली असता री काँऊटींग मध्ये वनिता खोत निवडून आल्याचे घोषीत करण्यात आले.

Post a Comment