म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्याचे ग्रामीण रुग्णालय हे तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने असून नसल्यासारखेच आहे ग्रामीण रुग्णालयातच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु आहे आणि दोन्ही आरोग्य केंद्रांचा भार सांभाळण्यासाठी डॉक्टरांची संख्या कमी पडत आहे . म्हसळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय गेल्या वर्षी सुरु झाले . त्यावेळी रुग्णालयात ३ डॉक्टर , स्टाफ , नर्स , शिपाई , लिपिक अशा प्रकारची नियुक्ती करण्यात आली होती . तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र देखील सुरु असून २ डॉक्टर व त्यांचे सहकारी कर्मचारी आरोग्य केंद्राचे काम पाहत होते . पण आता तेथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे एक प्रभारी डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात काम पाहत आहेत . ग्रामीण रुग्णालय गेल्या वर्षापासून सुरु झाले आहे . परंतु सुरुवातीला ३ डॉक्टर उपलब्ध करण्यात आले होते . त्यासोबत स्टॉफ , नर्स , शिपाई लिपिक अशा प्रकारची नियुक्ती करून ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाले होते . ग्रामीण रूग्णालयामधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर व त्यांचे सहकारी कर्मचारी हे देखील होते . पण प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे एक प्रभारी डॉक्टर जनतेला सेवा देत आहेत . सुरुवातीलाच म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षकपद डॉ . महेश मेहता यांची नियुक्ती करून त्यांनी आपल्या अनेक वर्षांच्या अनुभवाचा वापर करत ग्रामीण रुग्णालय सुस्थितीत करण्याचे काम केले . परंतु या साच्या परिस्थितीनंतर म्हसळा ग्रामीण रुग्णालयाला उतरती कळा लागली . काही कारणांमुळे तेथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ . महेश मेहता यांचे पद काढण्यात आले . त्यांच्यानंतर संपूर्ण कार्यभार श्रीवर्धन रुग्णालयाचे अधीक्षक डॉ . मधुकर ढवळे यांनी पाहण्यास सुरुवात केली . परंतु डॉ . ढवळे हे श्रीवर्धनला असल्याने याठिकाणी फारशे लक्ष देण्यास त्यांना जमले नाही . मुळात म्हसळा ग्रामीण रूग्णालयामध्ये असणारे डॉक्टर हे नविन आणि शिकाऊ असल्याने रुग्णांना योग्यवेळी योग्य सेवा देता येत नाही . त्यामुळे जनता ग्रामीण रूग्णालयावरती नाखुष आहे ३० खाटांच्या या रूग्णालयामध्ये जसवली येथील डॉक्टर आज तात्पुरते काम करत आहेत , परंतु म्हसळा ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्ती डॉक्टर एकही नाही . यापूर्वी अधीक्षक म्हणून काम केलेले डॉ . मेहता यांची रूग्णालयात प्रभारी अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर रुग्णांचे प्रश्न मार्गी लागतील . म्हसळा तालुक्यामध्ये ४३ गावांचा समावेश आहे . रुण ग्रामीण रुग्णालयाचा आसरा घेत असतात . परंतु एकच डॉक्टर असल्याने त्याठिकाणी रुग्ण जाण्यास टाळाटाळ करतात . स्टॉफ , तेथील असणारा नर्स या रात्र - दिवस आपल्या नेमून दिलेल्या वेळेनुसार काम करत असतात . त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून दिल्यास तेथील रुग्णांना सोईचे होणार आहे . रूग्णालयामध्ये दिवसाला शेकडो रुग्ण येत असतात . याचा विचार शासनाने करायला हवा त्यांना सेवा योग्य वेळेत मिळायला हवी . यासाठी जिल्हा प्रशासन लक्ष देणार आहे कि नाही ? अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे
म्हसळा ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर होते . परंतू ते राजीनामे देऊन गेल्यानंतर रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मी जसवली येथील डॉक्टर म्हसळा ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविले आहेत . माझ्यापरिने जेवढी सेवा देता येईल , तेवढी प्रामाणिकपणे करत आहे .
- डॉ मधुकर ढवळे, ग्रामीण रुग्णालय म्हसळा प्रभारी वैद्यकीय अधिकारी
कार्यालयीन वेळेत दूरध्वनीवर संपर्क साधला असता जिल्हा चिकीत्सक गवळी हे बोलण्यास तयार नाही . त्याचबरोबर प्रशासकीय कार्यालय जिल्हा रुग्णालय यांना संपर्क साधला असता . गवळी हे आपल्या कार्यालयात हजर आहेत अशी माहीती प्राप्त होते . मग नक्की . गवळी हे म्हसळा ग्रामीण रुग्णालया संदर्भात बोलण्यास टाळाटाळ का करतात ? हे मात्र गुलदस्तच आहे .
म्हसळा ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर नाही ही तेथील प्रथम अधिकारी मंडळीची चूक आहे . या विषयी मी तात्काळ चौकशी करून संबंधित प्रभारी कार्यालयाशी बोलणार आहे . तसेच या संदर्भात मी पालकमंत्री यांच्याशी लेखी म्हसळा तक्रार करून कामचुकार अधिकान्यांवर आहे करण्यास भाग पाडणार आहे..
- कृष्णा कोबनाक , भाजप जिल्हा उपाअध्यक्ष

Post a Comment