म्हसळेकरांना लागत नाही डीजे : पारंपारीक वाद्य वाजंत्री आणि "पुढल्या वर्षी लौकर या "च्या गजरात ६४० गणरायांना दिला निरोप.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरांत व तालुक्यांतील ६४० खाजगी गणरायाना आज निरोप देण्यात आला. म्हसळयांत एकही सार्वजनीक गणपती नसताना घरांतील खाजगी गणपती तोच आळीतील, वाडीतील व गावांतील या भावनेतून विसर्जन मिरवणुकीत सर्वजण सामील होतात त्यामुळे शहरांत  सायं ४ ते रात्री ८ पर्यत अतीशय उत्साही माहोल होता.
   म्हसळाकर निर्सगाच्या सानिध्यात व पर्यावरण जतन करणारे आसल्याने डी.जे/ डॉल्बी चा वापर न करता ढोल, ताशा, बेंजो ,खालू, झांजा व लेझीम पथक याच्या सहाय्याने या वर्षी प्रचंड उत्साहात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. सचिन शेटे,भाई बोरकर, विलास यादव , गजानन करंबे, गौळवाडीचे खताते, दिपा करडे, दत्ता सुर्वे, दिपल शिर्के, सिध्दी हॉटलचे चंदूशेठ कापरे यांच्या भव्य मूर्ती मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
                 विडिओ बघण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा