वीज कापण्याची नोटीस आता ग्राहकांच्या व्हॉट्सअॅपवर


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
- वीज बिल थकबाकीदारांचे वीज कनेक्शन आता सहजपणे महावितरणला कापता येणार आहे. एखाद्या ग्राहकाने वीज बिल थकवले असेल तर त्याला वेगळी नोटीस न पाठवता किंवा सूचना न देता केवळ त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर नोटीस म्हणून केवळ एक व्हॉटस्अॅप मेसेज पाठवला जाणार आहे. त्यानंतरही वीज बिल न भरल्यास किंवा योग्य प्रतिसाद न दिल्यास संबंधित कनेक्शन कापण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महावितरणच्या कारभाराला गती यावी म्हणून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) ग्राहकांना व्हॉटस्अॅप मेसेज पाठवण्यास मंजुरी दिली आहे.

महावितरणचे राज्यभरात सुमारे २ कोटी ४० लाख वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे जवळपास ३८ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून त्यामध्ये वरचेवर भर पडत आहे. थकीत वीज बिल न भरणाऱया ग्राहकावर कारवाई म्हणून त्याचे वीज कनेक्शन कापायचे असले तरी संबंधिताला नोटीस पाठवावी लागते. अनेकदा नोटीस वेळेत न पोहचल्यास कारवाई करताना मर्यादा येते. थकबाकीचा आकडा फुगतो. त्यामुळे थकबाकीचा आकडा तत्काळ कळावा, नोटीस झटपट मिळावी म्हणून व्हॉटस्अॅपवरून मेसेज पाठविण्यास मंजुरी दिली आहे.

🔸ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्यांना विशेष सूट

सरकारच्या डिजिटल पेमेंट धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने किंवा मोबाईल अॅपबरोबरच इतर पद्धतीने वीज बिल भरणाऱ्या ग्रााहकांना ०.२५ टक्के एवढी विशेष सूट वीज आयोगाने जाहीर केली आहे. लहान वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा