संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
डिझेल, पेट्रोल, गॅस, विजदर व त्या अनुषंगाने प्रवासी भाडे वाढ व अन्य जिवानावश्यक वस्तूंचे वाढते दर यानी सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे . या महागाईच्या निषेधार्थ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मंगळवार दिं.२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०वा . तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री सुनिल तटकरे, जि.प. अध्यक्षा अदीती तटकरे, विधान परिषद सदस्य आ. अनिकेत तटकरे करणार आहेत. सकाळी १०वा. म्हसळा एस.टी. स्टेडवरून निघणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे हजारो कार्यकर्ते सामील होणार आहेत.

Post a Comment