फोटो : प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ .ढवळे यांच्या समवेत माजी सभापती महादेव पाटील, शिवसेना शहर प्रमुख श्री.अनिकेत पानसरे व अन्य शिवसैनीक
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
अनेक समस्यानी ग्रासलेल्या ग्रामिण रुग्णालयाच्या समस्या स्थानिक व मंत्रालय पातळीवर सोडविण्याची जबाबदारी आमचीच आहे त्यासाठी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ .ढवळे यांच्या समवेत शहर शिवसेनेने लावलेली समन्वय बैठक यशस्वी झाली असे माजी सभापती महादेव पाटील यानी वार्तालाप करताना सांगितले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख अनिकेत पानसरे ,माजी युवासेना तालुका अधिकारी श्री. शशिकांत शिर्के, माजी ग्रामपंचायत सदस्य समीरजी करडे,शहर संपर्कप्रमुख अभयजी कळमकर,शहर क्षेत्र संघटक कल्पेश जैन, युवासेना उपशहर अधिकारी कौस्तुभ करडे, युवासेना उपशहर अधिकारी अजय करंबे, माजी युवासेना म्हसळा विभाग अधिकारी विशाल सायकर,अंकुश आदी शिवसैनिक उपस्थित होते.
वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकिय अधिकारी,कक्ष सेवक अशा अनेक महत्वाच्या पदांसह रिक्त कंत्राटी पदे भरावीत, त्याच बरोबरीने ३० खाटांचे ग्रामिण रुग्णालयाचे निकषा प्रमाणे एक्सरे मशीन व अन्य तांत्रिक सामान शासनाकडून तात्काळ मिळावे, P. M. रुम तयार असूनही वापरण्यात येत नाही ते तात्काळ सुरु करावे अशा मुख्य मागण्या शिवसैनिकांच्या होत्या.डॉ .ढवळे यानी तात्काळ बांधकाम खात्याचे प्रतिनिधी श्री .जेथ्थे साहेबाना बोलून P. M. रुम ताब्यात घेऊन यापुढे P. M. साठी बॉडी अन्य कुठेही न नेता तात्काळ वापर सुरु करण्याचे संबंधीताना आदेश दिले.
तसेच तांत्रिक साधन सामुग्री , ती हाताळणारे तज्ञ कर्मचारी मागणी बाबत आरोग्य सचिवाना पत्र लिहीण्याबाबत संबधीताना मार्गदर्शन केले. स्थानिक शिवसैनीक आरोग्य मंत्री डॉ . दिपक सावंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या सोडविणार आसल्याचे शिवसेना शहर प्रमुख श्री.अनिकेत पानसरे यानी सांगितले.

Post a Comment