श्रीवर्धन : प्रतिनिधी
२० जूननंतर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात येणार्या पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी होते . हरिहरेश्वर येथे श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविक येत असतात . तेवढाच दिलासा हॉटेल व्यावसायिकांना मिळतो . अन्यथा पावसाळ्यात पर्यटनावर आधारित असलेल्या सर्व घटकांना मंदीचा सामना करावा लागतो . श्रीवर्धन समद्र किनारा नेहमी पर्यटकानी गजबजलेला असतो . पण सध्या पर्यटक नसल्याने किनाच्यावर शुकशुकाट आहे समुद्रकिनारी विविध वॉटर स्पोट्र्स उपलब्ध असतात . या मध्ये बनाना , जेटकि , वॉटर बाइक रायडिंग , वाळूवर बाइक चालविण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो . त्याच प्रमाणे घोडा गाडी , उंट व घोड्यावरून फेरफटका मारता येतो . येणारे पर्यटक समुद्र स्नानाचा आनंद घेतात . खाद्यपदार्थ विकणारे अनेक स्टॉल चालु असतात सरबत , आईस्क्रीम नारळाचे पाणी विकणारे यांनी समुद्रकिनारा गजबजलेला असतो . पर्यटकांची वाहने उभी करण्यासाठी पार्किगची जागा कमी पडते . पर्यटक नसल्यामुळे समुद्रकिनार्यावर असलेले सर्व धंदे पूर्णपणे बंद आहेत . त्यातच पितृपक्ष सुरु झाला आहे . त्यामुळे अजुन पंधरा दिवस तरी पर्यटक येण्याची चिन्हे नाहीत नवरात्र सुरु झाल्यानंतर पर्यटक यायला सुरुवात होईल असा अंदाज आहे.वास्तविक पाहता श्रीवर्धन तालुक्यात पावसाळ्यात वातावरण फार सुंदर असते . आजूबाजूला हिरवेगार दिसणारे डोंगर , तसेच हिरवीगार बहरलेली भातशेती यामुळे वातावरण सुखद असते . ज्या पर्यटकांना पावसाळी पर्यटनाचा आनंद उपभोगायचा असेल तर श्रीवर्धन एक नंबरचे ठिकाण आहे पण सध्या तरी पर्यटक नसल्यामुळे श्रीवर्धन समुद्र किनार्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे .

Post a Comment