कोळे ग्रामपंचायत : परिवर्तन पॅनेलने घेतली प्रचारात अघाडी परिवर्तन पॅनल विरुद्ध पंचक्रोषी पॅनल यांच्यात होणार चुरस


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
      तालुक्यांत मादाटणे, मेंदडी, कोळे, आंबेत व खारगांव ( खुर्द) या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्यामध्ये चुरशीच्या होणाऱ्या निवडणुकांत कोळे ग्रामपंचायत आहे.कोळे ग्रामपंचायतीत सरपंच अधिक  ३ प्रभागातून ७ सदस्य आहेत. एकूण मतदार ८४८ त्यामध्ये स्त्रि मतदार ४९३ व पुरुष ३५५ आहेत. सरपंचपद अनु .जमाती ( स्त्रि) या प्रवर्गासाठी राखीव आहे. यामध्ये प्रभाग क्रं .३ मधून परिवर्तन पॅनलचे राजेंद्र महादेव मोहिते हे बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंच व  ३ प्रभागातून ६ सदस्यांसाठी निवडणूक आहे. परिवर्तन पॅनल विरुद्ध पंचक्रोषी पॅनल यांच्यात चुरस आहे. गावांत राजकीय वाद नाही असे असलेतरी परिवर्तन पॅनलला शिवसेनेचा व पंच क्रोषी पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा असल्याचे गावांतील जुने राजकीय कार्यकर्ते सांगतात.
फोटो : छाया चित्रांत कोळे ग्रामपंचायत इमारत व परिवर्तन पॅनलच्या मंडळीनी प्रचाराची सुरवात केलेली दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा