काँग्रेसच्या "भारत बंद" च्या हाकेला म्हसळयात मोर्चाचे आयोजन राज्यात शिवसेनेचा पाठींबा नसताना म्हसळा तालुका शिवसेना प्रमुखांचा मोर्चाला पाठींबा.

 

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
पट्रोल डिझेल चा भडकलेला भाव व वाढती महागाई विरूध्द आज म्हसळा तालुका काँग्रेस (आय ) चे वतीने तहसील कार्यालयावर अध्यक्ष डॉ. मुईज शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चात तालुका शिवसेना प्रमुख नंदू शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे शाहीद उकये, रफी घरटकर, रहीम तुल्ला मुकादम , माजी अध्यक्ष महादेव भिकू पाटील, सलीम चौगुले , नदीम दफेदार,आप्पा विचारे, शौकत घरटकर, अकमल कादीरी, सलाम हळदे, जहीर अकलेकर , तहा घरटकर, सलीम धनसे, असीफ चरफरे आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चेकऱ्यानी तहसीलदार रामदास झळके व सहा.पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे म्हसळा याना पेट्रोल, डिझेल,गॅसच्या दरवाढी विरुद्ध निवेदन दिले. मोर्चेकरी केंद्र शासन व पंतप्रधान मोदी यांच्या विरूध्द नाराजी च्या घोषणा देत होते . यावेळी डॉ . मुईज शेख , शाहीद उकये, महादेव भिकू पाटील व अन्य सदस्यानी केंद्र सरकार विरुद्ध आपली भूमिका मांडली.



इंधन दखाढीच्या विरोधात काँग्रेससह अन्य विरोधी पक्षानी पुकारलेल्या भारत बंदमध्ये शिवसेनेचा सहभागी न होण्याचा निर्णय असला तरी म्हसळा तालुका शिवसेनेची काँग्रेसच्या मोर्चाला साथ आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तुंची दरवाढ होत आहे. महागाईमुळे  सर्वसामान्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
- नंदू शिर्के, तालुका प्रमुख , म्हसळा.



म्हसळा तालुका काँग्रेसने बंदला मोर्चाचा पर्याय काढल्याने व्यापारी व ग्रामिण भागातील ग्राहकानी काँग्रेसचे आभार मानले.

चंपाशेट जैन, 

निवेदन देताना व मोर्चाला संबोधीत करताना काँग्रसचे डॉ . शेख व  शिवसेनेचे नदू शिर्के छायाचित्रांत दिसत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा