डॉ . सावंत डेंग्यूचा रुग्ण तपासत असताना
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
तालुक्यांत डेंग्यू, टाय फाईड, मलेरीया या साथजन्य रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांची वाढ झाली आसल्याचे म्हसळा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर सावंत यानी आमच्या प्रतिनिधी जवळ वार्तालाप करताना सांगितले.तसे निदान झालेले रुग्ण आसल्याचे संगितले. खूप ताप येणे, उलट्या होणे ही प्राथमिक स्वरूपाची लक्षणे असतात .कधी कधी रुग्णांना मोठ्या प्रमाणात उलट्या, जुलाब, मळमळ व घाम येतो आशा वेळी रूग्णाना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करावे असे डॉ. सावंत यानी सांगितले.
डेंग्यू ताप कशामुळे येतो ?
डेंग्यू हा आजार 'एडीस इजिप्ती' या नावाच्या डासांच्या चाव्यामुळे पसरतो. डेंग्यूच्या विषाणूचे चार प्रकार आहेत. १,२,३,४ यापैकी कोणत्याही विषाणूमुळे डेंग्यू होवू शकतो.
काय आहेत डेंग्यू तापाची लक्षणे :
अचानक ताप येणे.
तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना होणे.
सांधेदुखी, अंगावर लाल चट्टे येणे.
मळमळ, उलट्या आणि भूक कमी होणे.
जठराची सूज, ओटीपोटात दुखणे.
प्रतिबंधात्मक उपाय :
डेंग्यू होऊ नये म्हणून या उपाययोजना करण्याची गरज आहे.
आठवड्यातून किमान एकदा तरी घरातील पाण्याने भरलेली सर्व भांडी रिकामी करावी.
पाण्याची भांडी झाकून ठेवणे.
झाडांच्या कुंड्या, फुलदाण्या, फिशटँक इत्यादीतील पाणी नियमीत बदलावे.
घराभोवतलची, परिसरातील जागा स्वच्छ,कोरडी ठेवावी.
घराच्या भोवतालची व छतांवर असणारे अडगळीचे साहित्य ठेऊ नये.
घरातील दरवाजे, खिडक्या डास प्रतिबंधक जाळ्या बसवून घ्याव्यात.
डेंग्यूच्या रुग्णांनी डास चावणार नाही याची काळाजी घ्यावी, जेणेकरुन डेंग्यूचा प्रसार रोखता येईल.

Post a Comment