" म्हसळ्याचा राजा" पोलीस कर्मचारी वृंदाचे बाप्पाचे प्रचंड उत्साहांत विसर्जन ; पारंपारीक वाद्यांसोबत वारी ठरली म्हसळेकरांना आकर्षण


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
अनंत चतुर्थी पर्यंतच्या ६४० गणपतींच्या सुखरुप विसर्जना नंतर आज "म्हसळ्याचा राजा" म्हणून परिचीत असलेल्या पोलीस कर्मचारी वृंदाचे बाप्पाचे प्रचंड उत्साहात मिरवणुकीने हिंगुळ डोह येथे विसर्जन करण्यात आले. म्हसळा दिघी नाक्या वरून निघालेली मिरवणूक बाजारपेठ मार्गावरून नेत असता, व्यापारी व म्हसळा कराना आकर्षित करीत होती. चौथ्या वर्षात पदार्पण केलेल्या" म्हसळ्याचा राजा" चे सपोनी प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या  मिरवणुकीत शहरांतील व तालुक्यांतील सामाजिक , राजकिय, व्यापारी, कर्मचारी, महीला वर्ग मोठया संखेने सामील झाले होते.
मिरवणुकीत खालू बाजा सोबतच Psi गणेश कांदेकर व बुवा कमळाकर पद्मा भनगोजी यांची अखंड वारकरी संप्रदायची दिघी येथील मंडळाचे वारी हे म्हसळा कराना या वेळचे प्रचंड आकर्षण ठरले.
    मेंदडी कोळीवाडा येथील अंजनी महिला व सोमनाथ यात्रेकरू महिला मंडळ यांचे गायक भारती भरत पाटील व प्रेमा अशोक डोलकर यानी व महीलानी सादर केलेला नाच, विजय बुवा पायकोळी यांचे भजन शासनाचे स्वच्छता व आरोग्य, शिक्षण , नारी व बेटी बचाव , डॉल्बी नको भक्ती हवी या बाबत भक्ताना संदेश देऊन गेली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा