संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
तालुक्यातील खारगांव ( खुर्द) ग्रामपंचायत निवडणुकीत ३ प्रभाग , सरपंच आधिक ७ सदस्य अशी रचना आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस -शे.का.पक्ष आघाडी आहे. सरपंच पद सर्वसाधारण ( स्त्रि) या वर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी अघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा केला आहे .भा.ज.पा. व शिवसेना स्वतंत्र लढत आसल्याने लढतीत रंगत येणार आहे.
३ प्रभाग मिळून एकूण १२६८ मतदार असून स्त्रि मतदार ८१४ व पुरुष मतदार ४५४ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस -शे.का.पक्ष आघाडी शेका पक्ष ४ जागी तर राष्ट्रवादी काँग्रेस ३ जागी निवडणूक लढवीत आहे. दुसरे बाजूने शिवसेना सरपंचासह ८ जागा लढत आहेत. भाजपाने सरपंच व सदस्य पदासाठी दोनही ठिकाणी एकच उमेदवार स्पर्धत उतरविला आहे . त्यामुळे ते स्पधेत असून नसल्यासारखे आहेत. खारगाव ( खुर्द) ग्रामपंचायतीवर सध्य परिस्थितीत शिवसेनेची सत्ता आहे.राष्ट्रवादी काँग्रेस -शे.का.पक्ष एकत्रित व चाणाक्य राजनीतीचा वापर करीत
आहे, त्यामुळे शिवसेनेला सुध्दा आपले गट -तट बाजूला ठेऊन एकत्रित व संघ भावनेने लढणे गरजेचे असल्याची राजकीय निरीक्षकांची चर्चा आहे.
तालुक्यातील यापूर्वीच्या जि.प., पंचायत समिती व खरसई, रेवली व कणघर ( नागरी विकास आघाडी करून) या ग्रामवं यायत निवडणूकीत शेका पक्षाचे मंडळीनी पक्षाचे उमेदवार न देता आपली तालुक्यात ताकद कमी केली . खारगांव ( खुर्द) ग्रामपंचायतीत पक्ष मोठया प्रमाणात संघटीत असताना सरपंच पद मागणे गरजेचे होते आसा काही मंडळींचा तालुक्यात सूर आहे.

Post a Comment