श्रीवर्धनमध्ये महावितरणचा बोजवारा : ७ कनिष्ठ अभियंता पदे रिक्त ; हरिहरेश्वर, श्रीवर्धन ग्रामीण, निगडी, दिघी, बोर्लीपंचतन, दिवेआगर कार्यालय अभियंत्याविना


दिघी : वार्ताहर
श्रीवर्धन महावितरण सेवेचापुरता बोजवारा उडाला आहे . वाढत्या वीजग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागीय अधिकारी भेटत नसल्याने ग्राहक संताप्त झालेले बघायला मिळतात तालुक्यातील अनेक दुर्गम भागांतून बोर्लीपंचतन तसेच श्रीवर्धन येथील कार्यालयात वीजबिल कमी करण्यास आलेल्या ग्राहकाला अधिकारी न भेटल्याने नाराज होत परतावा श्रीवर्धन तालुक्यातील पाच ठिकाणी प्रमुख गावांमध्ये दुय्यम अभियंता कार्यालय आहेत . मात्र , वाढत्या वीजग्राहकांच्या समस्येमुळे व तालुक्यातील ५ विभागीय कार्यालय पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचारी व अधिकारी यांच्यावरील ताण वाढू लागला आहे . त्यामुळे महावितरणने पदे भरून सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे स्थानिक कार्यालयात अधिकारी नसल्याने ग्राहक श्रीवर्धन कार्यालयात येत असतात ; मात्र येथील उपलब्ध कर्मचारी व अधिकारी यांची संख्या कमी आहे त्यामुळे विविध कामांसाठी येणार्या ग्राहकांची रांग वाढत असते . रांगेत उभ्या असलेल्या बहुतांशी व्यक्तींच्या तक्रारी वाढीव बिलासंदर्भात असतात . तर काहीजण बंद झालेल्या मीटरच्या तक्रारी घेऊन येतात . दर महिन्याला वीजबिल येत नाही , तर कार्यालयात घेऊन जावे असे सांगण्यात येते . वाढीव बिलाबाबत श्रीवर्धन ये - जा होत असल्याने विजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . सध्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर निगडी , श्रीवर्धन ग्रामीण दिघी , बोर्लीपंचतन कार्यालयीन अभियंता , दिवेआगर अशा सात ठिकाणी कनिष्ठ अभियंता पद रिक्त आहेत . शिवाय श्रीवर्धन येथील कार्यालयात सहा कर्मचारी पदे रिक्त आहेत . वीज बिल कमी करण्यासंदर्भात वीस ते तीस किमी अंतरावरून श्रीवर्धन येथे जावे लागते , बोर्ली येथे महावितरणचे कार्यालय असून देखील कामकाज होत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे . महावितरण कंपनीत शाखा अभियंता लाईन वायरमन ऑपरेटर आदीसह विविध प्रकारची पदे कार्यरत आहेत . ग्राहकसेवेच्या दृष्टीने प्रामुख्याने लाईनमन , असि . लाईनमन आणि शाखा अभियंता या पदांना अधिक महत्त्व आहे इतर पदेही तितकीच महत्वाची असली तरी या पदाचा थेट ग्राहक सेवेवर परिणाम होतो . मात्र , गेल्या काही वर्षात श्रीवर्धन मध्ये लाईनमन , असि . लाईनमन आणि शाखा अभियंता ही पदे रिक्त राहत आहेत . याकडे कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असते . मोठ्या संख्येने पद रिक्त असल्याने ग्राहक सेवेचा बोजवारा उडत आहे . 


कंत्राटी कर्मचारी वेतनवाद....
महावितरण कंपनीत मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचारी भरले आहेत . या कर्मचार्यांना ठेकदारांमार्फत वेतन दिले जाते मात्र , अनेकवेळा ठेकेदार आणि महावितरण प्रशासन यांच्यातील समन्वया अभावी दोन ते तीन महिने वेतन मिळत नाही . आज वेतन स्थिती बरी असली तरी बर्याचवेळा आंदोलनाशिवाय वेतन मिळत नाही . अशी स्थिती आहे . कंत्राटी आणि नियमित कर्मचारी एकच काम करीत असताना नियमित कर्मचार्यापेक्षा कमी वेतनात कंत्राटी काम करतात . त्यामुळे समान काम समान वेतन हे सूत्र अद्याप का स्वीकारले नाही , असा सवाल या निमित्ताने व्यक्त होत आहे . 

सेवा नाही मात्र बिल भरा...
वीजबिल वसुलीसाठी ग्राहकांमागे तगादा लावणाऱ्या महावितरणकडून ग्राहकांना सुविधा देण्यात मात्र टाळाटाळ केली जात असल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे . एकीकडे बिलासाठी वेळोवेळी ग्राहकांना सतावले जात असताना दुसरीकडे ग्राहकांच्या तक्रारींकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते . 

वाढीब बिल कमी करण्यासाठी श्रीवर्धनला दोनदा फेऱ्या माराव्या लागल्या . बोर्ली विभागात असणारे महावितरण कार्यालयात कनिष्ट अभियंता नसल्याने मनस्ताप होतो .
-निलेश खंडेलोट , बोलपंचतन

कनिष्ठ अभियंता हे पद नवीन भरती द्वारे भरले जाते . सध्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर , निगडी , श्रीवर्धन ग्रामीण , दिघी, बोर्लीपंचतन , कार्यालय अभियंता , दिवेआगर अशा सात ठिकाणी कनिष्ठ अभियंता रिक्त आहे उपलब्ध अभियंत्यांकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे . उपलब्ध कर्मचारी अधिकारी यांच्यासह सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न आहे . 
-महेंद्र वाघपैंजण , उपअभियंता श्रीवर्धन महावितरण 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा