विशेष प्रतिनिधी
सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे,अशामहिलांच्या सन्मानार्थ व त्यांच्या नावे पाच राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. महिलांसाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार, कांगी पुरस्कार, माता जिजाबाई पुरस्कार, राणी गार्डीनलो झेलिंग पुरस्कार, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार तसेच राणी रुद्रमादेवी पुरस्कार (हा स्त्री व पुरुष या दोघांना देण्यात येतो) देण्यात येतात. हे सर्व पुरस्कार केंद्र शासनामार्फत देण्यात येतात.
या पुरस्कारचे नाव नारी शक्ती पुरस्कार असून एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार 8 मार्च या जागतिक महिला दिनी केंद्र शासनातर्फे दिला जातो. या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याकरिता आवश्यक कार्य व पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. विधवा, परितक्त्या, निराधार, अपंग महिलांचे पुनर्वसन करणे अशा कार्यात ज्या महिलांनी जाणिवपूर्वक प्रयत्न केले आहेत त्या महिला. शैक्षणिक प्रशिक्षण कार्य, पर्यावरण क्षेत्र, महिला स्वावलंबन या क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे. तसेच शेती व्यवसाय काबाड कष्ट करणाऱ्या महिलांचे विविध तांत्रिक यंत्राद्वारे ज्या महिलांनी श्रम जाणीवपूर्वक कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत अशा महिला. सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक सहभाग घ्यावा यासाठी ज्या महिलांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत अशा महिला. प्रस्ताव हे इंग्रजीमध्ये शनिवार दि.29 सप्टेंबर पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग श्रीबाग नं.2 डॉ.वाजे हॉस्पिटल जवळ ता.अलिबाग, जि.रायगड 402201 दूरध्वनी क्र.02141-225321, ई-मेल wcdora@gmail.com वर संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी कळविले आहे.

Post a Comment