संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
तालुक्यांतील मiदाटणे, मेंदडी, कोळे, आंबेत व खारगांव ( खुर्द) या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. तालुक्यात स्थानिक पातळीवर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन पक्ष राजकीय दृष्टया तुल्यबळ आहेत. अशीच लढत ग्रामपं चायतीत होणार आहे, अन्य भाजपा व कॉंग्रेस ( आय) सोयी नुसार राजकीय आघाडया करीत आहेत. तालुक्यात शेका पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा आहे.
पहिल्या फेरीत मांदाटणे ग्रामपंचायतीवर सरपंच चंद्रकांत पवार व अन्य ६ सदस्य बिनविरोध निवडणून आले आहेत.मेंदडी ग्रामपंचायतीवर ४ सदस्य बिनविरोध निवडणून आणण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आले आहे.कोळे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने अ.जा. या राखीव जागेतून उमेदवार निवडून आणून आपणही सत्ता संघर्षात असल्याची विरोधकाना जाणिव करुन दिली आहे.
कोळे ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण ( अ.ज .स्त्रि) राखीव आहे येथे शिवसेनेची सत्ता होती , लढत सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आहे. सेनेला सत्ता टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. खारगांव (खु) येथील सरपंच अरक्षण सर्वसाधारण स्त्री या प्र वर्गासाठी आहे . येथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस थेट लढत आहे. भाजपाने या ग्रामपंचायतीत सरपंच व एक सदस्य निवडणुकीत उतरवील्यामुळे शिवसेनेला सत्ता राखण्यासाठी दोन हात करावे लागणार आहेत. या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला शेका पक्षाने साथ दिली आहे.
आंबेत ग्रामपंचायतीत सरपंच अरक्षण सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गासाठी आहे . येथे थेट लढत शिवसेना- कॉंग्रेस ( आय) युती विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस अशी आहे. भाजपाने दोन प्रभागांतून उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे रंगत आली आहे . कोणत्याही परिस्थितींत या ग्रामपंचायतीवरील राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता काढून घेयची असा चंग शिवसेना व काँग्रेस ( आय) या विरोधकानी धरला आहे. या निर्णया मागेे कॉंग्रेस हाय कमांड साक्रिय आहे. त्यामुळे आंबेत मध्ये तालुक्याचे सर्व लक्ष केंद्रीत होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने मांदाटणे येथे सरपंच व अन्य सदस्य, मेंदडी येथे चार सदस्य बिनविरोध निवडून आल्याने N.C.P. ने तालुक्यात वर्चस्व राखले आहे.
Election #Sivsena #rasatrvafi #congres #ncp #shekap

Post a Comment