सोनघर : प्रतिनिधी
ग्रामलक्ष्मी उद्योग समूह मौजे सोनघर - खामगाव ता.म्हसळा जी. रायगड, मार्फत समूहाचे संचालक श्री विलास पारावे यांच्या संकल्पनेतून शहराकडे स्थळांतरीत झालेली गाव गावातील लोक पुन्हा गावाकडे परतण्यासाठी एका धेय्य वेड्या इंजिनिअरिंग केलेल्या तरुणांची रोजगार निर्मिती व्हावीत यासाठी साकार झालेली ग्राम नंदनवन या शेती विषयक प्रकल्पाचे रायगड चे खासदार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मा अनंतजी गीते साहेब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. ह्या उदघाटन सोहळ्यासाठी उपस्थित दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सल्लागार सुधींद्र कुळकर्णी, मनोहर सकपाळ , हंजे उधोग समूहाचे श्री संजय हंजे, जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले तसेच ग्रामलक्ष्मी समूहाचे डिरेक्टरी श्री नितेश लाबे, विवेक खापरे, जीवन आडीविलकर, आणि त्यांचे सहकारी व म्हसळा आणि माणगांव रत्नागिरी तालक्यातील शेतकरी ह्या योजनेचा आढावा घेण्यासाठी उपस्थित होते

Post a Comment