भापट येथे पारंपारीक पध्दतीने उत्साहात पार पडला गोविंदा उत्सव...


प्रतिनिधी 
दिनांक ३ सप्टेंबर  २०१८ रोजी भापट गावात गेली अनेक वर्षे पारंपारिक पद्धतीने गोविंदा उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवात  गावातील   सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन हा गोविंदा उत्सव गुण्यागोविंदाने साजरा केला . उत्सवात बुंधी , लाडु , दही , फरसान ,मिठाई , घरपट नाचणार्या गोविंदाला देऊन उत्साहित केले जाते. या गोविंदा उत्सवात मुंबई ग्रामस्थ मंडळ भापट , नवयुवक मित्र मंडळ, "ओम शिव सत्य क्रिकेट संघ , सत्तेश्र्वरी नाच मंडळ भापट ग्रामस्थ व महिळा  मंडळ भापट यांनी आपली प्रार्थनिय उपस्थिती लावून सन २०१८ चा गोविंदा उत्सव उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा