श्रीकांत बामणे : प्रतिनिधी मलईकोंड
मैत्री फाउंडेशन मौजे. मलई कोंड ता. माणगांव, जि. रायगड या सेवाभावी संस्थेच्या वतीने गौरींगणपती उत्सवाचे औचित्य साधून रायगड भूषण समाजसेवक मा. माजिद भाई लोखंडे यांच्या उत्कृष्ट समाज सेवेबद्दल मैत्री फाउंडेशन तर्फे समाज गौरव पुरस्काराने (शाल, श्रीफळ, व सन्मान चिन्ह) सन्मानित करण्यात आले व अंकुर फाउंडेशन चे संस्थापक आणि पत्रकार मा. उदय चव्हाण यांचे फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट पत्रकारिते बदल गौरविण्यात आले तसेच मौजे चांदोरे गावचे सुपुत्र कु. विशाल अशोक पवार भारतीय सैनिक इंडियन आर्मी यांच्या देश सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले वरील सन्मानित पाहुण्यांच्या उपस्थितीत मलई गावातील वयाच्या ८० वर्षे पुढील जेष्ठ दांपत्य श्री व सौ लक्ष्मीबाई सहदेव पाटोळे, श्री सौ पार्वती शिवराम मनवे, श्री व सौ सरस्वती पांडुरंग सावंत, श्री व सौ शेवंती पांडुरंग गायकर, श्रीमती. आनंदीबाई भागोजी शिर्के, श्रीमती. प्रभावती आत्माराम मनवे श्रीमती जयवंती यशवंत गायकर, श्रीमती सरस्वती सखाराम चिंचालकर यांना शाल ,श्रीफळ व जीवन गौरव सन्मानचिन्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशन चे अध्यक्ष सुधीरजी मनवे कार्याध्यक्ष श्रीकांत बामणे सेक्रेटरी संजय पाटोळे तसेच नवनिर्वाचित वनी मलई सरपंच श्री दाजी पा सावंत तसेच मैत्री फाउंडेशन चे सर्व सभासद व महिला आघाडी यांच्या उपस्तिथीत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी श्री संजय पाटोळे सर व श्री सुरेंद्र मनवे सर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.



Post a Comment