संजय खांबेटे : प्रतिनिधी म्हसळा
गावस्तरावर पोलीस पाटील या पदाला कायदा व सुव्यवस्थेसह अन्य प्रशासकीय कामात विशेष महत्त्व आहे , त्यामुळे गणेशोत्सव आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामात पोलीस पाटलांनी विशेष सर्तक राहावे , असे आवाहन म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी येथे केले . श्री गणेशोत्सव आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची बैठक आयोजित करण्यात आली होती . त्यात प्रवीण कोल्हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते पोलीस पाटलांनी आपली कर्तव्ये चोख बजावल्यास गावातील अपराधांचे प्रमाण नक्कीच कमी होते , असे त्यांनी सांगितले . १३ ते २३ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव आहे , तसेच तालुक्यातील मांदाटणे , खारगाव खुर्द , मेंदड़ी , कोळे व गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेत या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत . या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन होणे आवश्यक असल्याचे कोल्हे यांनी सांगितले या बैठकीला पोलीस पाटील संघटनेचे म्हसळा तालुका अध्यक्ष अनंत पाटील , उपाध्यक्ष महादेव धुमाळ , सचिव महेंद्र विचारे , रमेश दुर्गबले , किसन पवार , नीलेश लटके , विकास पोटले , मुखत्यार नजीरी , सुरेंद्र विचारे , सूर्यकांत रिकामे , शंकर वाघरे , हरिचंद्र म्हात्रे , रमेश पाटील , दिगंबर रामचंद्र दिवेकर , अजलेकर , काशीनाथ शितकर , दिलीप जाधव , नीलेश तांबे , स्नेहा चंद्रकांत पवार विनया आंबेरकर , नलिनी बामणे , सुरेखा घोलप , मनीषा मोरे , लक्ष्मण गाणेकर , रवींद्र पवार आदी पोलीस पाटील उपस्थित होते

Post a Comment