म्हसळा (निकेश कोकचा )
म्हसळा तालुक्यातील वारळ गावामध्ये घरामध्ये कोणही नसल्याचा फायदा घेत चोरी केल्याची घटना गुरुवार दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे. चोरांनी घरामध्ये घूसून साडेसात तोळे सोन्याचे दागिने व दोन लाखाची रोकड लंपास केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, वारळ येथील अनंत चाळके रा. वारळ दंत्त मंदिर जवळ काळसुर रोड हे सहकुटूंब चुलत्याच्या बारावा ( कार्य) साठी वारळ गावामध्ये गेले होते. अनंत चाळके सह कुंटूब घरामध्ये नसल्याचा फायदा घेत काही स्थानिक अज्ञात चोरट्यानी त्याच्या घरामध्ये प्रवेश करूण चोरी केली. यामध्ये चोरांनी त्यांच्या घरातून साडेसात तोळे सोन्याचे दागिने व दोन लाखाची रोकड चोरल्याची माहिती चाळके यांनी पोलिसांना दिली. अनंत चाळके यांच्या फिर्यादी वरूण म्हसळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर चोरीची माहिती मिळताच अलिबाग येथून ठसे तज्ञांना बोलवण्यात आले होते. चोरी झालेल्या ठिकाणावरूण प्राप्त झालेल्या ठश्यांच्या निशानावरूण लवकरच चोरांना अटक करण्यात येईल.
- सपोनि प्रविण कोल्हे, म्हसळा पोलिस ठाणे

Post a Comment