दांडगुरी : श्रीकांत शेलार
श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे बोर्लीपंचतन . अशा या बोर्लीपंचतन मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. बिनविरोध निवड की निवडणूक या विषयी खलवते सुरु आहेत . सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत बिनविरोध निवड करायची असा सुर धरला आहे हे ऐकायला मिळत आहे मात्र सरपंचपद पहिला टप्पा आमचा तर सरपंचपद पहिला टप्पा आमचा असा नाट्य प्रयोग पहावयास मिळत आहे . सरपंचपदाच्या रंगीतमय आणि संगीतमय गंमतीशोर चर्चा पहायला मिळत आहे सरपंच , उपसरपंच सदस्य हे भिजत घोंगडे केव्हा सुटणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे . बोर्लीपंचतन ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे एक तारेवरची कसरत असुन एक मिनि विधानसभा निवडणूक असे पाहिले जाते .
याचे खरे पड़घम वाजले ते एप्रिल रोजी सुकुमारभाई तोंडलेकर यांच्या वाढदिवसानिमित्त . होळीचे मैदान बोर्लीपंचतन येथे सुकुमारभाई तोंडलेकर यांचा वाढदिवस जंगी प्रमाणात करण्यात आला होता यावेळी रक्तदानही शिबिर घेण्यात आला होता . तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांतील स्थानक नेते मंडळी उपस्थित होती . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महमद ( दादासाहेब ) मेमन , मंदारजी तोडणकर , शेकापचे लीलाधर खोतसर आदी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा देऊन आपण सर्वांनी मिळून मिसळून एकत्रितपणे ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा मानस व्यक्त केला होता त्याला तेवढाच प्रतिसाद सुकुमारभाई तोंडलेकर यांनीही दिला होता त्याप्रमाणेच हि चर्चा सुरू झाली . याच धर्तीवर शिवसेना , शेकाप , राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्ते सहित डॉ . बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये सरपंच , उपसरपंच , सदस्य याबाबतीत चर्चेचे गुऱ्हाळ झाले. एकुण सदस्य संख्या पंधरा मध्ये शिवसेनेनी सात सदस्य आणि सरपंचपद मागणी केली . राष्ट्रवादी काँग्रेसने सात सदस्य आणि सरपंचपद मागणी केली तर शेकापने तिन सदस्य आणि उपसरपंचपदी पुर्ण टर्मची मागणी केली होती . मात्र प्रथम सरपंचपद आम्हाला यावरून थोडे मागे पुढे चर्चा होत आहे तिही चर्चा सुटेल अशी आशावाद दिसत आहे.
एक सरपंच मानधनाचा , एक सरपंच नामधारी
सदरची चर्चा आंबेडकर भवनामध्ये संपत नाही तोपर्यंत गावभर मजेशीर चर्चा पसरली की पुढील ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असे दोन सरपंच राहणार . एक सरपंच हा मानधनाचा आणि दुसरा सरपंच हा नामधारी असणार . पंधरा सदस्य संख्या असणारी हि ग्रामपंचायतींमध्ये सात सदस्य आणि सरपंच शिवसेनेचे , सात सदस्य आणि सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचा , तिन सदस्य आणि उपसरपंच पुर्ण टर्म शेकापचा . याचाच अर्थ एक सरपंच हा नामधारी व तिन सदस्य नामधारी द्यायचा . म्हणे या नामधारी यांना खुर्च द्यायची , जबाबदारी द्यायची अशी खुशामदार चर्चा सध्या बोर्लीपंचतन मध्ये रंगत आहे बोर्लीपंचतन ग्रामपंचायत निवडणूक न व्हाव ती बिनविरोध निवड व्हावी ही सर्वच राजकीय पक्षांची व कार्यकर्ते यांची भावना आहे तीच अपेक्षा मतदारांची आहे . बिनविरोध निवड झाल्यास गावात तंटे होणार नाही तर भानगडीचा प्रश्नच निर्माण होणार नाही . श्रीवर्धन मध्येच नव्हे तर रायगडच्या पटलावर एक आदर्श निर्माण होणार आहे . दोन प्रमुख पक्ष एकत्र येणे ही काही खाऊच गोष्ट नाही तर हे मोठेपणाचे लक्षण आहे . कुठे लिहून ठेवले नाही की दोन बलाढय पक्षानी एकत्रित येऊ नये म्हणून काही मंडळी निवडणूक लागावी म्हणून दैवत पाण्यातही ठेवतील कशासाठी तर आपले काही दिवस भल्याने जाण्यासाठी मात्र यावर स्थानिक नेत्यांन व पदाधिकारी यांनी एकत्रितपणे येणे महत्वाचे आहे चचांवर चर्चा सत्र तर होणार . आजच हा प्रश्न सुटणार नाही यावर आणखी दोन तीन वेळा चर्चा सामोपचाराने घेऊन सोडल्यास नक्कीच चांगले फलीत घडणार आहे यात तिळामात्र शंका नाही .
borli. #Shreevardhan #Politics #Shivsena #Rastranvadi #NCP #Congres #Election

Post a Comment