प्रांत प्रविण पवार दरणे कुटुंबीयांचा सत्कार करत असताना.
संजय खांबेटे, म्हसळा
महसुल नायब तहसीलदार या पदावरून नियत वयो मानानुसार निवृत्त होताना मदन दरणे यांचा महसुल विभागातील प्रत्येक शाखेचा सेवाकाल हा अतीशय उत्कृष्ट असा झाला , उर्वरीत काल सुध्दा त्याना व त्यांच्या कुटुंबीयाना अतीशय चांगलाच जाणार असे प्रशंसनीय मत व शुभेच्छा श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यानी मदन दरणे यांच्या सेवानिवृत कार्यक्रमांत व्यक्त केले . यावेळी म्हसळा तहसीलदार रामदास झळके, श्रीवर्धनचे प्रभारी तहसीलदार विरसींग वसावे, नायब तहसीलदार किसन भिंगारे, प्रकाश भोईर, जितेंद्र टेंबे, मंगेश पवार, संतोष तावडे, गोवींदराव चाटे, सलीम शहा, दत्ता खर्चे यानी मदन दरणे यांच्या समवेत कार्यालयीन काम करताना त्यांच्या सकारात्मक शिकवणीं व अनुभवा बाबत विविध किस्से सांगत मनोगत व्यक्त केले व दरणे कुटुंबीयाना शुभेच्छा दिल्या यावेळी निवडणूक ना. तहसीलदार नामदेव मोरे, पुरवठा अधिकारी नथुराम सानप, खामगांव सर्कल मोरे,विशाल भालेकर, जयंत भस्मा, महेश रणदीवे, श्रीमती तृप्ती साखरे, सरिता लिमकर, दमयंती पाटील, पुनम कारंडे,कविता ऐनकर, भाऊ पाटील, गोरखनाथ माने, पांडुरंग पागीरे, विरकुड, कळंबे , शेळके, गजानन गी-हे, केशव कांबळे, बाळा उभारे, दिपक चव्हाण, दादा मोरे (ड्रायव्हर) उपस्थित होते.

Post a Comment