श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
जगातील सर्व घटकांचा यथार्थ ,मार्मिक व हृदय संपन्न बाबींचा मिलाप म्हणजे शिक्षक होय. आधुनिक तंत्रज्ञानाने विश्व पादाक्रांत केले असले तरी स्वतःचे स्थान अढळ व अटल ठेवणारे शिक्षक सर्व प्रिय आहेत .डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या असीम त्याग व विद्ववतेचे प्रतीक असलेले आजचा दिवस सर्वांना प्रेरणादायी आहे .अशी भावना कोमल पवार या विद्यार्थीनिने शिक्षक दिन प्रसंगी व्यक्त केली .
श्रीवर्धन तालुक्यातील महर्षी कर्वे विद्यलयात शिक्षक व विद्यार्थीनी यांनी मिळुन आजचा शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जयंती समारंभ संपन्न करण्यात आला. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन व बॅचलर ऑफ कॉमर्स या दोन ज्ञान शाखांचे अध्ययन व अध्यापन महर्षी कर्वे महाविद्यलयात दिले जाते . महाविद्यालयातील अक्षता भगत, ऐश्वर्या गुरव , ध्रुवा पटेल ,अपेक्षा पेवेकर व कोमल पवार यांनी शिक्षत्वाची जबाबदारी पार पाडली आहे .
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अनिल वाणी ,नीलिमा शेरखणे, रुपेश गारफडे ,संस्कृती विभागाच्या तृप्ती विचारे,अक्षता तोडणकर, ,केदार जोशी,दिनेश भुसाने,प्रभाकर चोगले, आकाश सावंत व मनीषा माशीलकर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे .



Post a Comment