दि. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत होणार मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण ; ऑनलाईन पद्धतीने ही करता येईल मतदार नोंदणी..



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
आगामी सन 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्यात येणार असून त्याकरिता मतदार नोंदणीसाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे अशी माहिती म्हसळा  तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधीकारी रामदास झळके  यांनी दिली. तहसीलदार कार्यालयांत  आयोजित छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम संदर्भात पत्रकारांजवळ वार्तालाप करताना  झळके यानी सांगितले.
      मतदार यादी अद्ययावत व जास्तीत जास्त शुध्द स्वरुपात व्हावी यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहा.मतदार नोंदणी अधिकारी तसेच सर्व बीएलओ यांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.  मतदार यादीतील तफावतींचा शोध घेण्यात आला असून या तफावती दूर करण्यासाठी उपाययोजना निश्चित करण्यात आलेल्या आहेत.  मयत,दुबार व स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्याची कार्यवाही करण्याबाबत सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहा.मतदार नोंदणी अधिकारी यांना सूचना देण्यात आत्याबाबत झळके यानी सांगितले.         
     मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून मा.भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी रायगड जिल्ह्यातील प्रस्तावांस मंजूर दिली आहे. त्यानुसार म्हसळा तालुक्यात ७० मतदान केंद्र अस्तित्वात आहेत. मतदान केंद्राची शंभर टक्के पडताळणी झालेली आहे.  दिव्यांग पात्र व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करणे, त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करणे, महिला मतदारांचे प्रमाण वाढविणे यासाठी तालुक्यांतील वाडया वस्तीवर स्थानिक B. L. O च्या माध्यमांतून स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 
      दिनांक 10 जानेवारी 2018 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार 
तालुक्यात एकूण मतदार ४७ हजार २६३ मतदार आहेत. यामध्ये स्त्री  मतदार २४ हजार ६८५ , पुरुष मतदार  २२ हजार ५७८  आहेत.या मतदारपैकी ब्लॅक-व्हाईट छायाचित्र असलेल्या सदरमतदरांकडून रंगीत छायाचित्र स्विकारुन ERONET मध्ये त्यांचे अद्ययावतीकरणाचे काम निरंतर सुरु आहे.  
        ऑनलाईन मतदार नाव नोंदणीचे काम सुरू आहे.  नवीन मतदार नोंदणी झालेल्या मतदारांना निवडणूक ओळखपत्र देण्यात आलेले आहेत.  तसेच मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे eci.nic.in या संकेतस्थळावर व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे  ceo.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्धwww.nvsp.in या लिंकद्वारे ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करता येईल.

 मतदार नोंदणी व दावे हारकतीचा कार्यक्रम

        प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी दिनांक 01 सप्टेंबर 2018. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 01 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018.  दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी दि.30 नोव्हेंबर 2018 पूर्वी.  डाटा बेस अद्यावतीकरण व पुरवणी यादीची छपाई दि. 03 जानेवारी 2019 पूर्वी.  अंतिम मतदार यादी प्रसिध्दी दि.04 जानेवारी 2019 ला होणार.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा