प्रतिनिधी म्हसळा
साद आगरी युवकांची, समाज परिवर्तनाची... अस म्हणत, आगरी सामाज एकता, संघटन बांधणी, प्रचार आणि प्रसार यासाठी श्रीवर्धन- म्हसळा तालुक्यातील १८ गाव आगरी युवा संघटनेच्या वतीने भव्य बाईक रॅली चे अजोजन करण्यात आले होते.
गाव पातळीवर युवा संघटना आणखी बळकट व्हाव्ही आणि तरुणांनी एकत्र यावं यासाठी या बाईक रॅली च आयोजन करण्यात आल्याचे आजोयकांनी सांगितले. रॅली मध्ये श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील शेकडो तरुण बाईकसह सामील झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून whatsapp च्या माध्यमातून तरुणाईला एकत्र करून या रॅली चे नियोजन करण्यात आले होते, तसेच प्रत्येक गावासाठी दोन गावप्रमुख नेमून त्यांच्यावर त्या गावातील तरुणांना एकत्र करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच रॅली संदर्भात नियमावली प्रसिद्ध करून तरुणांना त्यांचे पालन करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. खरंगाव वरून सुरू झाले रॅली प्रत्येक गावातून सामाजिक एकतेचा संदेश देत वारळ गावात येऊन थांबली आणि रॅली ची सांगता झाली वारळ येथे झाली.
रँली यशस्वी होण्यासाठी सर्व समाज बांधव, युवक, स्थानीक तसेच मुंबई गावमंडळ व तेथील कार्यकारिणी, समाजातील जेष्ठ मंडळी, सहकार्य करणारी मुंबई व स्थानीय कार्यकारिणी, सल्लागार तसेच रँली प्रमुख यांनी मोलाच सहकार्य केले.
सामाजिक एकता व संघटन बांधणी साठी रॅली चे आयोजन करण्यात आले होते. गणरायाच्या कृपाशीर्वादानेच आपले उद्दिष्ट सफल झाले व रॅली निर्विघ्नपणे पार पडली.
- आदेश धुमाळ, १८ गाव अध्यक्ष आगरी युवा संघटना मुंबई

Post a Comment