संजय खांबेटे , म्हसळा
दिघी पोर्टने माणगांव -दिघी रस्त्यावर वाहतुक करताना प्रचंड दहशत निर्माण केली आसल्या बाबत सातत्याने तक्रारी होत असताना आज दिघी पोर्टमधून कॉइल घेऊन Pasco (M. I.D.C. विळे-भागाड) येथे जाणाऱ्या ट्रेलरने म.रा.वि.वि.कं. चे H.T.Line चे पोलला जोरदार धडक देऊन अपघात केल्याची घटना घडली, ट्रेलरचा ड्रायव्हर धर्मेंद्र सानिकराम यादव याने दिलेल्या फिर्यादीवरून अपघात र.नं. १२/२०१८ने अपघाताची नोंद केली आसल्याची माहीती ठाणे अंमलदार प्रमोद कदम यानी दिली . धर्मेंद्र आपल्या ताब्यांतील ट्रेलर क्रं. MH46 /H-4996 कॉइल भरून दिघी वरुन Pasco (M. I.D.C. विळे-भागाड) येथे जात असताना खानलोशी ते मेंदडी च्या परीसरांत ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याचे बाजूला ट्रेलरने म.रा.वि.वि.कं. चे H.T.Line चे पोलला जोरदार धडक देऊन अपघात केला यामध्ये म.रा.वि .वि. मंडळाचे फार मोठे नुकसान झाले.पोल व तारा वाकल्याने नुकसान झाले. सदर अपघाताचे वृत्त कळताच म्हसळा पो .स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यानी अपघात स्थळी भेट दिली व अन्य नुकसानी बाबत माहीती घेतली.
माणगांव -दिघी रस्त्यावर दिघी पोर्टच्या वाहतुक ठेकेदारांची बेदरकार वाहतुक सुरु असते, अनेक वेळा ते वाहतुकीचे नियम तोडून दहशत निर्माण करतात, दुसरेबाजने रस्ता १९ टनाचा व वाहतुक ३ ० ते ३५ टन मालाची होत असते यामुळे माणगाव ते दिघी या भागात यांच्या वाहनांची अपघाताची संख्या जास्त आहे. दिघी पोर्टने निकषा प्रमाणे रस्ते होई पर्यंत वाहतुक बंद ठेवावी हाच योग्य पर्याय होईल .
महादेव पाटील माजी सभापती , पं.स.म्हसळा

Post a Comment