म्हसळ्याची शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल ९० टक्केपेक्षा जास्त शाळा झाल्या डिजिटल : विद्यार्थी गिरवू लागले डिजिटलचे धडे


म्हसळा : महेश पवार
तालुक्यात शिक्षणाची क्रांती होत आहे विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढत आहे तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यायची गुणवत्ता विकास करण्याचे प्रयत्न सुरु आहेत . शिक्षकांनाही सखोल ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रात शिक्षण परिषदेचे दरमहा आयोजन करण्यात येत आहेत . सदर परिषदेत शिक्षकांना समृध्द करण्यासाठी विविध विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन केले जात आहे . अध्ययन स्तराचे विश्लेषण करून सर्व शिक्षकांना कृती आराखडा तयार करण्याचे आदेश शेडगे यांनी दिले आहेत . ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विद्यार्थाना १०० टक्के भाषिक कौशल्य व गणिती क्रिया या शैक्षणिक वर्षांत एक अभिनव उपक्रम गटशिक्षणाधिकारी शेडगे यांच्या मार्गदर्शनातून व संकल्पनेतून साकारला जाणार आहे . शिष्यवृत्ती परीक्षेत १०० टक्के पास व ५० टक्के शिष्यवृत्तीधारक हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे त्याचे नियोजन देखील करण्यात आले तालुक्यात विशेष ग्रामीण भागात लोकसहभागातून आणि शिक्षकांच्या परिश्रमातून तालुक्यातील प्रत्येक शाळा आज डिजिटल झाली आहे विज्ञान युगाच्या प्रोसेस प्रमाणे आज प्रत्येक विद्यार्थी हा डिजिटल शिक्षण घेत आहे काही शाळेत विद्यार्थी स्वतः प्रोजेक्टर हाताळत आहेत . पुस्तकासोबत संगणक असल्याने शिक्षण अगदी सुलभ आणि जलत गतीने होत आहे . मागील प्रभारी गटशिक्षण अधिकारी गजानन साळुंखे यांनी तालुक्यात शिक्षणाची क्रांती घडविण्यास सुरूवात केली . प्रभारी पद असताना शिक्षण क्षेत्रात अ वर्ग प्राप्त केला आहे आणि आता कार्यरत असलेले अभ्यासू गट शिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांच्या | नेतृत्वाखाली तालुक्याची स्थिती अधिक बळकट झाली आहे तालुक्यात शाळासिी कार्यशाळा , शिक्षक - विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा , विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन , क्रीडा स्पर्धा , वृक्षारोपण आणि त्याची काळजी , राखी तयार करणे ती वृक्षांना बांधणे , शाळा व केंद्र स्तरावर हस्तलिखित तयार करणे , तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षक तंत्रस्नेही होण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन , विविध संस्थांच्या माध्यमातून शाळांसाठी शैक्षणिक उठाव , त्यांच्यामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन , स्पिकिंग इंग्लिशचे प्रशिक्षण , केंद्र स्तरावर बालमेळाव्याचे आयोजन , प्रत्येक मुलाची आरोग्य तपासणी , गणित व इंग्रजी स्पर्धा , विज्ञान कोडे हे उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविले जातात . परंतु , शिक्षण विभागाची प्रमुख पदे आजही रिक्त आहेत . गेल्या २०१५ पासून गट शिक्षणाधिकारी नाही . बीट विस्तार अधिकारी नाही . शिक्षकांसह केंद्रप्रमुखाची काही पदे रिक्त आहेत . त्यामुळे या सर्व पदाचा अतिरिक्त भार हजर अधिकारी वर्गाला सोसावा लागत आहे ज्याप्रमाणे तालुक्यात शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे परंतु , जे अधिकारी - कर्मचारी कार्यरत आहेत ते मात्र आज प्रामाणिकपणे काम करीत असल्यामुळे तालुका आज शिक्षण क्षेत्रात चमकत आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा