रायगड जिल्हयातून राष्ट्रवादीला हद्दपार करणार : - नविद अंतुले ( मा. मुख्यमंत्री बॅ. अंतुलेंचे चिरंजीव)


जब तक सुरज चांद रहेगा अंतुले तुम्हारा नाम रहेगा... घोषणांनी म्हसळा दुमदुमले :आंबेतमध्ये राष्ट्रवादीचा तर मेंदडी मध्ये शिवसेनेचा  सुपडा साफ : खारगाव खुर्द येथे सरपंच एकमतांनी विजयी : रायगड जिल्हयातून राष्ट्रवादीला हद्दपार करणार : - नविद अंतुले

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीची मतमोजणी पुर्ण झाली असुन यापैकी  तिन ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहे तर दोन ग्रामपंचायतीमध्ये सेना कॉग्रेस युतीचा झेंडा फडकला आहे. संपुर्ण जिल्हया साहित कोकणाचे लक्ष लागलेल्या आंबेत ग्रामपंचायती मध्ये माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्या चिरंजीव नवीद अंतुले यांनी आपले नेतृत्व सिद्ध् करित सरपंच उमेद्वारा सहीत आठ सदस्य उमेद्वारांना विजय मिळवून दिला आहे.आंबेत येथे राष्ट्रवादी पक्षाला फक्त एकच जागा जिंकता आली. खारगाव खुर्द येथे राष्ट्रवादीचा निसटता विजय झाला असुन येथे सरपंच फक्त एक मतांनी निवडून आला आहे. तर सेनेचे पाच सदस्य विजयी झाल्याने उपसरपंच मात्र सेनेचा बसणार असल्याने ग्रामपंचायतीच्या निर्णयामध्ये मोठा विरोधाभास भविष्यात पहावयास मिळेल. मेंदडीमध्ये पंचायत समितीच्या सभापती छाया म्हात्रे यांनी आपला करिष्मा दाखवत सत्ता काबीज केली आहे. येथे सरपंचा साहित दहा उमेद्वार राष्ट्रवादीचे विजयी झाले आहेत. तर सेनेला फक्त एकच जागेवर समाधान मानावे लागले.मांदाटणे ग्रामपंचायत मध्ये सरपंच सहीत सहा जागा बिनविरोध निवडणू आल्या असून  येथे तिन जागांसाठी मतदान झाले असुन येथे तिनही जागांवर राष्ट्रवादीचे उमेद्वार विजयी झाले आहेत. म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये नविद अंतुलेच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाने जबरदस्त कमबॅक केले असुन पुढील काळामध्ये कॉग्रेस राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते असे मत जाणकार वर्तवत आहेत.


आंबेत ग्रामपंचायती पासून सुनिल तटकरेच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे.कॉग्रेस सेना युतीच्या माध्यमातून संपुर्ण रायगड जिल्हयातून राष्ट्रवादीला हद्दपार करुण बॅ.एआर अंतुले साहेबांना श्रद्धांजल वाहणार - नविद अंतुले ( मा. मुख्यमंत्री  बॅ. अंतुलेंचे चिरंजीव)


विजयी सरपंच व पक्ष 
१) आंबेत - अफरोजा नाजीम डावरे ( सेना काँग्रेस युती)
२) मेंदडी - राजेश्री रविंद्र कांबळे ( राष्ट्रवादी )
३) खारगाव खुर्द - वनिता चंद्रशेख खोत ( राष्ट्रवादी १ मतांनी विजयी )
४) कोळे - देवका गणेश जाधव ( सेना )
५) मांदाटणे - चंद्रकांत लक्षण पवार उर्फ चंदू ( राष्ट्रवादी बिनविरोध )

विजयी सदस्य-
 आंबेत ग्रामपंचायत- प्रक्र१- 
१)लुकमान महमुद डावरे( कॉग्रेस सेना  
२ ) शेवंती गणपत भावे ( कॉंग्रेस सेना ) 
३ जिनत शब्वीर रहाटविलकर ( कॉग्रेस सेना ) 
प्रभाग क्र २- १ ) पांडूरंग भिकू आंबेकर 
२ ) प्रभाकर नारायण चव्हान ( काँग्रेस सेना ) 
३ ) सुगंधा महादेव गोठल ( कॉग्रेस सेना ) 
प्रभाग क्र ३- १ ) राष्ट्रवादी नाव उपलब्ध नाही 
२ ) नुजहत गुलजार डावरे ( कॉग्रेस सेना ) 
३ ) ऋतूजा राजेंद्र सावंत ( कॉग्रेस सेना )

मेंदडी ग्रामपंचायत - 
प्रभाग क्र १ ) काशिनाथ धर्मा वाघमारे( बिनविरोध राष्ट्रवादी ) 
२ ) केशर हिरामण कांबळे ( बिनविरोध राष्ट्रवादी )  
३ )लता संदिप शेवाळे ( सेना ) 
प्रक्र२- १ ) नदीम नजीब कादरी ( कॉग्रेस ) 
२ )दिनसा  अफन नजीरी ( राष्ट्रवादी )
 प्रभाग क्र ३_ ज्योती बालोजी पाटील ( बिनविरोध राष्ट्रवादी ) २ ) महादेव जाण्या धूमाळ ( राष्ट्रवादी )
३ ) राजेश्री मधुकर पाटील ( राष्ट्रवादी ) 
प्रभाग क्र ४- १ )रमेश लक्ष्मण चिपोलकर ( राष्ट्रवादी ) 
२ ) लक्ष्मी देवानंद पायकोळी ( राष्ट्रवादी ) 
३ ) निशामोरेश्वर पाटील( बिनविरोध राष्ट्रवादी )


कोळे ग्रामपंचायत- .
प्रक्र१- १ ) प्रमोद महादेव जाधव ( सेना )
२ ) निरमा नरेश राणे ( राष्ट्रवादी ) 
३ ) शारदा शांताराम विचारे (राष्ट्रवादी )
प्रक्र२- १ ) मनिषा मनोहर डिंगणकर ( सेना )
२ ) अमोल शंकर पेंढारी (सेना )
प्रक्र ३- १ ) सुजाता सुरेंद्र बांद्रे ( सेना )
२ ) राजेंद्र मनोहर मोहिते ( बिनविरोध सेना )

खारगाव खुर्द ग्रामपंचायत -
प्रक्र१- १) गुलाब सुतार ( राष्ट्रवादी )
२) कानू धर्मा कांबळे ( शिवसेना ) 
३ ) संगीता म्हात्रे ( राष्ट्रवादी )
प्रक्र२ - १ ) नरेश मेंदडकर ( सेना )
 २ ) अलका कांबळे ( सेना ) 
प्रक्र३- १ ) मुकेश पाटील ( सेना ) 
२ ) दर्शना मेंदडकर ( सेना )

मांदाटणे ग्रामपंचायत -
१ )भिकू डोंगरे ( बिनविरोध राष्ट्रवादी ) 
२ ) निता पवार ( बिनविरोध राष्ट्रवादी ) 
३ ) शांताराम खैरे ( बिनविरोध राष्ट्रवादी ) 
४ ) शेपाली लाड ( बिनविरोध राष्ट्रवादी ) 
५ ) प्रज्ञा दिवेकर ( बिनविरोध राष्ट्रवादी )
धनश्री मुंढे ( बिनविरोध भाजप ) 
प्रक्र१- १ ) शुभांगी शिगवण ( राष्ट्रवादी ) 
२ ) मिनाक्षी मनवे ( राष्ट्रवादी )
प्रक्र२-१ ) शंकर रामजी गोरीवले ( राष्ट्रवादी )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा