म्हसळयातील ५ ग्रामपंचायतीसाठी अर्ज येण्यास सुरुवात ; पहील्याच दिवशी आंबेत मधून एकमेव शादाब डावरे यांचा अर्ज दाखल


संजय खांबेटे : प्रतिनिधी म्हसळा
म्हसळा तालुक्यातील महत्वाच्या  ५ ग्रामपंचायतीचा थेट सरपंच व सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे .आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.आजच्या पहील्याच दिवशी  आंबेत ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रं .३ मधून शादाब इकबाल डावरे यानी सर्वसाधारण सदस्य म्हणून आपला उमेदवारी  अर्ज दाखल केला आहे .
      मांदाटणे , खारगांव खुर्द, मेंदडी ,कोळे व आंबेत या महत्वाच्या ५ ग्रामपंचायती आहेत, सर्व इच्छुकाना ऑन लाईन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. जात वैधता प्रमाणपत्राबाबत आयोगाकडून अद्यापही आदेश आलेला नाही.
     आज बुधवार दि. ५ सप्टें. २०१८ ते मंगळवार दि. ११ सप्टें.पर्यंत अर्ज दाखल करणे, बुधवार दिं.१२ सप्टें. छाननी, शनीवार दिं .१५ सप्टें.अर्ज मागे घेणे, त्याच दिवशी चिन्ह वाटप, बुधवार दिं .२६ सप्टेंबर सकाळी ७.३० ते सायं.५.३० मतदान ( आवश्यक असल्यास), गुरुवार दिं .२७ सप्टेंबर मतमोजणी. असा आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

तालुक्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरु असताना विज व इंटरनेट सुविधा खंडीत होण्याचा प्रकार वाढला आहे . शासनाचे सेतू सह सर्व उमेदवाराना त्रास होत आहे . संबधीत यंत्रणेला  तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधीकारी यानी योग्य ती समज द्यावी.- महादेव पाटील, माजी सभापती.पं.स . म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा