जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत श्रीवर्धन तालुक्यातील कराटे खेळाडूंचे यश ; मुंबई विभागीय शालेय कराटे स्पर्धेकरिता निवड


श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
      
बदलत्या काळा नुसार खेळा कडे बघण्याचा ग्रामीण भागातील दृष्टीकोन बदलत आहे .शहरांतील खेळाडू च्या तुलनेत ग्रामीण भागातील खेळाडु यशस्वी होत असल्याचे चित्र सर्वत्र निदर्शनांस येत आहे. हे खेळासाठी आल्हाददायक बाब आहे. अपुरे साहित्य व प्रतिकुल परिस्थिती चा सामना करत ग्रामीण भागातील खेळाडु नी कमावलेले यश नेत्रदीपक ठरत आहे.त्याचीच प्रचिती  अलिबाग  येथील जिल्हा क्रीडा संकुल मधे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय कराटे सर्वांना आली .या स्पर्धेत श्रीवर्धन तालुक्यातील कु.क्रूतार्थ प्रसाद कोलथरकर व कु.सिद्धी दीपक सावंत -र .ना .राऊत विद्यालय श्रीवर्धन आणि कु .अनुज राजेश पडवळ -न्यु मॉडर्न इंग्लीश गोखले हायस्कुल व कु .वेदीका शंकर गाणेकर -मो .सो .विद्यालय बोर्लीपंचतन या विध्यार्थानि आपल्या खेळाचं उत्तम प्रदर्शन केल .या सर्वांची मुम्बई येथे सम्पन्न होणाऱ्या मुंबई विभागीय शालेय कराटे स्पर्धेकरिता निवड झाली आहे. सदरच्या स्पर्धेत जवळ पास 450 खेळाडु नी सहभाग नोंदवला आहे . यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ह्या खेळाडूंच्या यशामागे चम्पियन्स कराटे क्लब श्रीवर्धन चे प्रशिक्षक सेनसाई अविनाश मोरे ,सेन्साई शैलेंद्र ठाकूर तसेच सेन्साई रितेश मुरकर आणि मुख्य प्रशिक्षक सेन्साई संतोष मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा