म्हसळा शहरात ग्राहकांनी फुललेली बाजारपेठ व बायपास जवळ वाहतुक वळवताना सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण कोल्हे व कर्मचारी दिसत आहेत.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
गणेश उत्सवासाठी मुंबई, पुणे येथून गणेश भक्त गावाकडे येण्याची सुरवात झाली आहे, गणेश भक्त व कुटुंबीयाच्या आगमनाने म्हसळा शहरातील बाजारपेठ खरेदीसाठी फुललेली दिसत आहे. चाकरमानी स्पेशल बस, छोटया मोठया टुरीस्ट गाडया घेऊन येतात त्याना सणाचा आनंद दिलखुलास लुटण्यासाठी व शहरात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी म्हसळा स. पो.नी. प्रविण कोल्हे व पोलीस कर्मचाऱ्यानी या वर्षी अतिशय चोख बंदोबस्त वाहतुक डायव्हर्शन करुन म्हसळा बाजारपेठेवरील वाहतुक कोंडीचा त्रास सोडविला होता , त्यामुळे शहरातील अंर्तगत वाहतुक
( ऑटोरिक्षा व्यवसायीक), फार मोठ्या प्रमाणात ग्राहक व सर्व व्यापारी फारच खुश होते.
व्यापाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मंदिचे सावट असतानाच मुंबईकरांच्या आगमनाने म्हसळा बाजारपेठ खरेदीसाठी फुलल्याने व्यापाऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. म्हसळा पोलिस खात्यामार्फत बायपास येथे वाहतुकीसाठी चोख नियंत्रण असल्याने दैनंदिन वाहतुक कोंडीने ग्रस्त असलेल्या म्हसळेकरांना यावेळी वाहतुक कोंडी मुक्तचा अनुभव पहावयास मिळाला.
म्हसळा शहरात वाहतुक कोंडी नियंत्रीत करण्यासाठी बायपास येथे मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते ,शहरातुन होणारी अवजड वाहतुक गणपतीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. गणेश भक्त, पर्यटक व चाकरमान्यानी बायपासचा वापर करण्याबाबत मार्गदर्शक फलक
लावण्यात आले आहेत.
म्हसळा सपोनी प्रविण कोल्हे व कर्मचाऱ्यानी वाहतुकीबाबत अत्यंत योग्य नियोजन केल्याने बाजारपेठेत गणेश भक्त ग्राहक फार मोठ्या प्रमाणात आले होते. यावेळी शिस्तबध्द वाहतुक व्यवस्था आस ल्याने भक्त, ग्राहक व व्यापारी सुखावले होते.
किराणा,कापड, डेकोरेशन, प्रोव्हीजन, फळे व भाजी, पूजेचे साहीत्य यां सर्व प्रकारच्या व्यापार्याची फार मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली.
-सुरेश शेठ जैन, अध्यक्ष कापड व्यापारी

Post a Comment