फोटो : शिवसेना- कॉंग्रेस (आय) युती ची आंबेत मधील प्रचार रॅली, शिवसेनेचे अंधेरीचे उपविभाग प्रमुख प्रमोद पांडुरंग सावंत नेतृत्व करताना..
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील आंबेत ग्रृप ग्राम पंचायत ही महसुली उत्पन्नासाठी अत्यंत महत्वाची व माजी मुख्यमंत्री बॅ . अंतुले यांच्या गावातील ग्राम पंचायत असल्याने राजकीय दृष्टीकोनातून सुध्दा अत्यंत संवेदनशील ग्रामपंचायत आहे.शिवसेना- कॉंग्रेस (आय) युती,NCP व भाजपच्या मंडळीनी प्रत्यक्ष घरभेटीच्या माध्यमातून प्रचार सुरु ठेवला आहे.
ग्रामपंचायतीचे सरपंच अरक्षण-सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गासाठी आहे . राजकीय दृष्टीकोनातून थेट लढत शिवसेना- कॉंग्रेस (आय) युती विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस अशी आहे. भाजपाने दोन प्रभागांतून उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे रंगत आली आहे . कोणत्याही परिस्थितींत या ग्रामपंचायतीवरील राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता काढून घेण्याचा चंग विरोधकांनी धरला आहे. आंबेत मध्ये तालुक्यातील राजकीय धुरंदरांचे लक्ष लागले आहे.
सरपंच अधिक ९ सदस्य अशी रचना आहे .सरपंच पदासाठी शिवसेना- कॉंग्रेस ( आय) युतीच्या उमेदवार म्हणून कॉंग्रेस ( आय) च्या अफरोजा नाजीम डावरे व NCP च्या सुवर्णा अकाश म्हाप्रळकर यांच्यात लढत आहे. प्रभाग क्रं १ मधून ३ सदस्यांसाठी शिवसेना- कॉंग्रेस ( आय) युती विरुद्ध NCP थेट लढत आहे. प्रभाग क्रं २ व ३ मध्ये प्रभाग एक प्रमाणेच रंगत आहे. या दोनही प्रभागांतून भाजपने अ.रहीम झटाम व सुरेश पवार याना उमेदवारी देऊन शिवसेनेला चेक दिला आहे .
NCP ची काही मंडळी नाराज असल्यामुळे त्यानी प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. तर काहीनी शिवसेनेचा आश्रय घेऊन प्रचार सुरू केला आहे .

Post a Comment