म्हसळा ब्राह्मण आळीतील राधाकृष्ण मंदीर
संजय खांबेटे, म्हसळा प्रतिनिधी
म्हसळयातील श्रावणी सप्ताहाची आज दु. १२ वा. सांगता झाली. श्री राधाकृष्ण मंदीरांत श्रावणांतील कृ . प्रतिपदेला सप्ताहाची सुरवात होते तर श्रावण कृ. अष्टमीला ( गोपाळकाला) सप्ताहाची सांगता होते. सप्ताहाची सुरवात १९१८ ला झाल्याचे सांगण्यात येते , तालुक्यांतील व शहरांतील हींदू समाजातील सर्व जाती, पोटजातीतील मंडळी आनंदी सण व प्रसंगांतून एकत्र असतात तशीच एकमेकांच्या दुःखात ही तेवढ्याच ताकतीने एकत्र असावी ही सप्ताहा मागील कल्पना आसल्याचे सांगण्यात येते. या सप्ताहाची सुरवात ब्राह्मण समाजाकडून होते. तर सप्ताहाची सांगता पेठकर ( वाणी, शिंपी व मराठा ) समाजाकडून होण्याची परंपरा आहे. यामध्ये सप्ताहांत भजन, किर्तन व अन्य धार्मीक गाणी म्हणून देवाला जागृत ठेवायचे आणि आमच्या शहरांतील व तालुक्यातील जनतेला रोगराई व अन्य संकटा पासून मुक्त ठेव असे श्री राधा- कृष्णाला व अन्य देवाना अवाहन करण्याची परंपरा आहे यामध्ये त्वष्टा -कासार ,देवज्ञ, परीट, कुंभार, नाभीक, साळी, रोहीदास,भंडारी, सीकेपी असे शहरांतील सर्वच समाज सप्ताहांत सहभागी असतात.
प्लेगचे संकट वाचविण्यासाठी श्रावणी सप्ताहाची सुरवात.
मुंबईत १८९७ मध्ये प्लेग आला होता, त्याच्या नंतर १९०१ ला रायगड मध्ये आला त्यात जिल्ह्यातील १११६ लोक,१९१० मध्ये ६४३, १९२० मध्ये १९८ लोक मृत्यू मुखी पडले. त्यावेळी स्वतंत्र असणाऱ्या जंजीरा संस्थानातही प्लेगची साथ आली होती. या साथीत संस्थानातील १८९६-९७ मध्ये २९, १९१२-१३ मध्ये ११८ व १९१७ -१८ मध्ये १४७ लोक मृत्युमुखी पडले होते त्याच कालावधी पासून रायगड जिल्हयातील विविध तालुक्यांतून व शहरांतून सप्ताहाची परंपरा सुरु झाली आसावी. अशी वदंता आहे .म्हसळा शहरांत गोपाळ काल्याला सप्ताह संपतो तर खरसई येथील सोमजाई मंदीरात सप्ताह आज पासून सुरू होण्याची परंपरा आहे.

Post a Comment