श्रीवर्धन मध्ये फुटनार २०९६ दहीहंड्या ; आनंदाची परंपरा जपण्याचे पोलिसांचे आवाहन...


दिघी : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील गावात जागोजागी गोविदांचा गळका . . सजलेल्या दहीहंड्या . त्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये लागणारी चुरस . . गोविंदा पथकांवर होणारा पाण्याचा शिडकावा अन कुठे डीजेच्या तर कुठ पारंपारिक ढोलताश्यांचा तालावर थिरकणारी पावले . . थर रचताना होणारी धडपड . . कधी पहिल्या प्रयत्नात ; तर कधी दोन - चार प्रयत्नांती दहीहंडीला होणारा गोविंदाचा स्पर्श . . प्रसंगी गोविंदा पथकांमध्ये आपसात किंवा आयोजकांबरोबर होणारी बाचावाची . . असा सारा हंगामा गोपाळकाळाच्या दिवशी येथे पाहायला मिळतो . श्रीवर्धन पोलिस ठाण्या अंतर्गत २ सार्वजनिक दहीहंड्या व ६८ फिरणार्या आणि ८७६ खाजगी दहीहंड्या तर दिघी सागरी पोलिस ठाण्या अंतर्गत ३५ सार्वजनिक दहीहंड्या व १११५ खाजगी दहीहंडया आहेत . तालुक्यात एकूण २०९६ दहीहंड्या उद्या फुटणार आहेत . सणाच्या आनंदाला गालबोट लागू नये म्हणून पोलिस खास काळजी घेत आहेत . तर नागरिकांनी शांततेत सण साजरे करावे असे आवाहन दिघी पोलिस ठाण्याचे अधिकारी डी टी सोनके यांनी केले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा