दिघी : गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती आगमनाच्या तयारीला सुरुवात झाली तर दुसरीकडे घरांमध्ये गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात सुरु आहे यंदा गणेश मूर्तीच्या दरात वाढ झालेली असली तरी मागणीही वाढल्याने मूर्ताकार आंनदात आहेत . श्रीवर्धन मधील बाजारपेठेत खरेदीदारांची लगबग सुरु झालेली पाहायला मिळते गणेशाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात घरगुती आणि सार्वजनिक मंडळांची मिळून अधिक मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विराजमान होतात . दिड दिवसाचे १२०० तर पाच दिवसाचे २५०० गणेश मूर्ती आणि सार्वजनिक १ असून आनंतचतुर्थाचे ८०० व एकवीस दिवसाचे ५ अशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना बोर्लीपंचतन परिसरात होणार आहे . गेल्या तीन महिन्यांपासून येथील कारखान्यामध्ये दिवस - रात्र कामे सुरु असून आता गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे मूर्तीचे दर चारशे ते पाचशे रुपयांनी वाढले आहेत . मात्र कितीही महागाई वाढली तरी कोकणी माणसाच हा गणेशोत्सव थाटामाटात साजरा होणारच . गणपतीच्या आगमनाची चाहूल लागल्यापासून बाजारपेठेत व्यापाड्यांनी विविध प्रकारची कापडी मखरे विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवल्याचे दिसत आहे विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्यांनी आतापासूनच बाजारपेठ सुगंधित केली आहे गौरी गणपतीसाठी लागणारे हार लोकांचे लक्ष दुकानांकडे वेधून घेताना दिसत आहेत . लाडू , मोदक , साखरफुटाणे दुकानांवर दिसू लागले आहेत . गौरी गणपतीच्या गाण्यांची , फुगडयांची , अभंग - भजनांच्या , मंत्र व आरत्यांच्या कॅसेट्स , सीडीज बाजारात आल्या आहेत.

Post a Comment