कोळे ग्रामपंचायतीमधील दुबार नोंदणी असलेल्या मतदारांवर होऊ शकते कारवाई : किमान १ वर्षाच्या शिक्षेची कायद्यांत तरतुद


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 

म्हसळे तालुक्यांतील कोळे ग्रृ. ग्रा.पंचायत हद्दीतील सुमारे २६ मतदारांची नावे दुबार आसल्याची तक्रार ग्रामपंचायत निवडणूक  लढविणाऱ्या ७संदस्यानी लेखी तक्रार केली आहे. त्यांची नांवे मागठाणे , ठाणे,दहीसर, भांडुप, बोरीवली, गोरेगांव, दिंडोशी, अंधेरी अशा मतदार संघात आसल्याची पुराव्यानिशी तक्रार केली आहे. उद्या होणाऱ्या निवडणूकीत संबधीताना मतदान करण्यास देऊ नये अशी तक्राार दारांची मागणी आहे.



पार्श्वभूमी

तहसीलदार म्हसळा याना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे कोळे गृ. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकानी मार्च २०१८ मध्ये तक्रार केली होती. तक्रारीत मुंबईतील उपनगरांतील विधान सभा मतदार संघातील व्होटर्स क्रंमाका सह  माहीती दिली असताना. तहसीलदार म्हसळा यानी संबंधीत अर्ज मे २०१८ ला निकाली काढला होता.
काय आहे  कायदा, शिक्षा व राज्य निवडणूक आयोगाचा आदेश?
१)भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम मध्ये मतदार यादीत ज्या व्यक्तीने नावाची नोंदणी एका पेक्षा जास्त वेळा केली असेल त्यांच्या विरुद्ध दावा चालविण्याची व न्यायालयात त्यांचा अपराध असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जास्तीत जास्त  एक वर्षा पर्यंत शिक्षा देण्याची तरतूद कलम ३१ मध्ये आहे.
२) काही वेळा ग्रामिण/ शहरी भागातील मतदारांची नावे शहरी/ ग्रामिण भागातही अढळून येतात. त्यानी जर ग्रामिण/ शहरी भागातील  निवडणुकीसाठी मतदान केले असेल तर त्याना शहरी / ग्रामिण भागासाठी मतदान करू देण्यात येऊ नये . मतदार यादीवर तसे अभिप्राय असावे


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा