संजय खांबेटे प्रतिनिधी म्हसळा
तालुक्यांतील मादाटणे, मेंदडी, कोळे, आंबेत व खारगांव ( खुर्द) या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार व म्हसळ्याचे स. पो.नी. प्रविण कोल्हे यानी अंत्यत कडक वा शिस्तीचे धोरण आखले आहे
ग्रापंचायत हद्दीत व पंचक्रोषीत निवडणुकीचे अनुषंगाने रूट मार्च करण्यात आला . एकूण 5 ग्रामपंचायत निवडणूक करिता 4 अधिकारी 49 पोलिस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता नेमण्यात आल्याचे सांगितले. मतदान प्रक्रिया पारदर्षक राबविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 30 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे 51 ग्रामस्थांना सीआरपीसी 149 नोटीस देण्यात आलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडण्यासाठी शासन कटीबध्द आहे. प्रक्रियेंत हस्तक्षेप अगर शांतता भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे पोलीस सूत्रानी सांगितले.

Post a Comment