संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
तालुक्यांतील मादाटणे, मेंदडी, कोळे, आंबेत व खारगांव ( खुर्द) या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका साठी मतदान सुरू आहे. जोरदार उन्हाचा तडाखा आसूनही ग्रामिण भागातील मतदार अत्यंत उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी झाला आहे . सकाळी ११.३ ० पर्यत ३६.६७ % मतदान झाल्याचे तालुका निवडणुक कक्ष प्रमुख नायब तहसीलदार के.टी. भींगारे यानी सांगितले. सर्व केंद्रावर शांततेत, सुरळीत व पारदर्शक पणे मतदान प्रक्रिया सुरु आसल्याचे सपोनी प्रविण कोल्हे यानी सांगितले.

Post a Comment