दांडगुरी : श्रीकांत शेलार
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने परिविक्षाधीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रवीण सिनारे यांना श्रीवर्धन तालुक्याच्या गटविकास अधिकारी पदी नियुक्ती केली . मात्र त्यांच्या मनमानी कारभारावर स्थानिक लोकप्रतिनिधी चांगलेच नाराज झाले आहेत . अधिकार्यांनी स्थानिक जनतेने निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधीचा आदर राखत त्यांना सन्मानाची वागणूक देणे अपेक्षित असते . मात्र नवनियुक्त बीडीओ मात्र लोकप्रतिनिधीना अशी कोणत्याही प्रकारची वागणूक देत नसल्याची चर्चा पंचायत समितीत रंगली आहे . आपल्या दालनाचा पडदा नेहमी बंद ठेवला जातो . लोकप्रतिनिधीना किंवा स्थानिक जनतेला बीडीओंशी संपर्क साधता येत नाही . सिनारे हे हुशार व प्रशासकीय ज्ञानाचे अभ्यासक असल्याने त्याचा फायदा श्रीवर्धन तालुक्यातील विकास कामे करण्यास होईल अशी अपेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधीना होती मात्र त्यांचा कामाच्या बाबती चुणूक दाखवण्यात अल्पावधीत अपयशी ठरल्याचे दिसत आहेत .
गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधी या सर्वांना सोबत घेत सामोपचाराने तालुक्यातील सर्वांगीण विकासाबाबत चर्चा करावी . जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारिनी याबाबत बीडीओंना समज द्यावी .
- बाबुराव चोरगे , उपसभापती श्रीवर्धन प. स.

Post a Comment