माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुलेच्या आंबेत गावचे नाव राखण्यासाठी कॉंग्रेस ( आय) शिवसेनेच्या उमेदवारांचे भावनिक अवाहन.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांची राजकीय सुरवात आंबेत या त्यांच्या जन्मगावा पासून झाली, नंतर श्रीवर्धन विधानसभा व त्या पाठोपाठ रायगड लोकसभा असा राजकीय आलेख उंचावला. त्याच दृष्टी कोनातून मतदार संघात काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी बॅ. अंतुलेच्या जन्मगावातील ग्रामपंचायतीतील कॉंग्रेस (आय) व शिवसेनेच्या उमेदवाराना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्रक  सरपंचपदाच्या उमेदवार अफरोजा नाजीम डावरे व प्रभाग १ मधील लुकमान महामुद डावरे, शेवंती गणपत भावे व जीनत शब्बीर रहाटवीलकर यानी काढले आहे. कॉंग्रेस (आय) व शिवसेनेचे उमेदवार म्हणजे बॅअंतुलेना मानणाऱ्या गटाचे आसल्याने त्यानाच मतदान करावे असे पत्रकत म्हटले आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा