प्रतिनिधी : म्हसळा लाईव्ह
सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी प्रकाश पाटील यांना,
या वर्षीच्या "श्रेयस चित्रकला गौरव" या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.श्रेयस वाचनालय आणि डाँ.यशवंत मनोहर संशोधन केंद्र, हिंगणघाट यांच्यावतीने हा पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आला आहे.
येत्या 16 डिसेंबर 2018 रोजी, वरोरा(आनंदवन),जि.चंद्रपूर येथे ,महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक ,ज्येष्ठ पत्रकार, समाज सेवक यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रेयस वाचनालयाचे
अध्यक्ष डॉ. चंद्रकांत नगराळे यांनी दिली आहे.श्रेयस वाचनालयाचे, पुरस्कार प्रदान करण्याचे हे पाचवे वर्ष आहे. यावर्षी जीवनगौरव, साहित्य, नाट्य, काव्य, छायाचित्रण, चित्रकला आणि संगीत ह्या क्षेत्रात विशेष योगदान व कार्य करणार्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.

Post a Comment