संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील महत्वाच्या ५ ग्रामपंचायतीचा थेट सरपंच व सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे ,त्यामध्ये मांदाटणे , खारगांव खुर्द, मेंदडी ,कोळे व आंबेत या महत्वाच्या ५ ग्रामपंचायती आहेत, त्या अनुषंगाने श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या प्रमुख़ उपस्थित तालुक्यातील पदाधिकारी व वरील पाचही ग्रामपंचायत क्षेत्रांतील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली ..यावेळी मा. श्री.प्रशांत शिंदे उपाध्यक्ष रायगड जिल्हा भाजपा,सौ.सरोज म्हशीलकर जिल्हा चिटनीस,श्री.मंगेश म्हशीलकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य,श्री.महेश पाटील जिल्हा चिटनीस युवा मोर्चा,श्री.आनंदकुमार सावंत जिल्हा चिटनीस कामगार आघाडी, श्री.शैलेश पटेल तालुका अध्यक्ष,श्री.तुकाराम पाटील तालुका सरचिटणीस, श्री.मंगेश मुंडे शहर अध्यक्ष,सौ.मिना टिंगरे तालुका अध्यक्ष महिला मोर्चा,श्री.शरद चव्हाण तालुका अध्यक्ष युवा मोर्चा,श्री.गणेश बोर्ले तालुका उपाध्यक्ष, श्री.जयवंत आवेरे तालुका चिटणीस,श्री.भालचंद्र करड़े तालुका उपाध्यक्ष,सौ.प्रियंका शिंदे उपाध्यक्ष महिला मोर्चा,सौ.सुनंदा पाटील तालुका चिटणीस महिला मोर्चा,मिसबा शेख,श्री.समीर धनसे तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा,श्री.मुस्तफा सरखोत, श्री.संतोष सावंत तालुका चिटणीस,श्री. अनिल टिंगरे तालुका चिटनीस,श्री.परवेज चिलवान उपाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा,श्री.अब्दुल रहीम झटाम बूथ अध्यक्ष आंबेत,श्री. गोविंद भायदे कोकण विकास आघाडी,श्री.दिलीप कोबनाक,श्री.सुबोध पाटील बूथ अध्यक्ष खारगांव खु,श्री.रावजी घाणेकर बूथ अध्यक्ष देहेन, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कोबनाक यानी कार्यकर्त्यांजवळ संवाद साघताना केंद्र शासनातील सर्वसामान्याचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजांतील दुर्बळ घटकांसाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य विकास, सार्वजनिक दळण वळण व वाहतुक , पर्यटन, कृषी, शाश्वत विकास , उज्वला गॅस योजनांसह महीलांसाठी विविध योजना राबवित असतानाच आत थेट निवडीने आलेल्या सरपंचांची मुदत सहा वर्ष झाली असे अनेक विषय पदाधिकाऱ्यानी ग्रामिण भागातील चावडीवर नेणे आवश्यक आसल्याचे संंवादात सांगितलेे .

Post a Comment