घुमेश्वर गावात गणेशोत्सव उत्साहात साजरा : इको फ्रेंडली मखर व मूर्तींचा वापर तर मखर सजावट स्पर्धेत अनंत खेडेकर यांचा प्रथम क्रमांक


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा तालुक्यातील मौजे घुमेश्वर गावात दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षीही असाच एक उपक्रम राबविण्यात आला. गावात एकूण 37 घरगुती गणपती बाप्पांच्या मूर्तींची स्थापना करून गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी लागू केल्याने यावर्षी घुमेश्वर गावात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेशभक्तांनी पुढाकार घेऊन मातीची गणपतीची मूर्ती व मंडप सजावट साठी थर्माकोल व इतर प्लास्टिक साहित्यांचा वापर न करता निसर्गाप्रती सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा केला. 
गावात पाच दिवस भक्तिमय वातावरणात आरती, पूजापाठ, भजन, पारंपारिक गीत गायन करून शक्ती-तुरा नाच नाचत पाच दिवस तरुण-तरुणी, मुंबईकर चाकरमनी, जेष्ठ मंडळी, महिलावर्ग तसेच सर्व गावकऱ्यांनी गणेशोत्सव सणाचा आनंद लुटत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गावात इको फ्रेंडली गणपती मखर सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत श्री.अनंत खेडेकर यांच्या घरातील मखर सजावटीला प्रथम क्रमांक देण्यात आले. खेडेकर यांच्या घरी मखर सजावट करण्यासाठी नारळीचे ओले झाप, बांबू कलकीचे ठोके, तुळस, सुका पेंढा, गवत, आणि मातीचा वापर करून त्यांचे चिरंजीव आकाश खेडेकर व मुलगी अश्विनी खेडेकर यांनी सुंदर असा देखावा सादर केला होता. तसेच द्वितीय क्रमांक मागील वर्षी ज्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता ते श्री.सखाराम हरी दिवेकर यांना देण्यात आला. दिवेकर यांनी ही गवत, जंगली झाडांच्या फांद्या, फुले, फळे, मातीचा वापर करून देखावा सादर केला होता. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक श्री.सुरेश विश्राम गायकर यांनी निसर्गाशी निगडीत सादर केलेल्या देखाव्यास देण्यात आला. तर उत्तेजनार्थ बक्षीस गावातील जेष्ठ नागरिक भजनी बुवा श्री.केशव लक्ष्मण घोले यांना देण्यात आले. तसेच यावेळी गावातील बालगोपालांना देखील रोख रक्कम देऊन त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या गणेशभक्तांना घुमेश्वर मुंबई मंडळ अध्यक्ष श्री.सुहास महागावकर, सचिव जगदीश लटके यांच्याकडून रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
तसेच विसर्जनच्या दिवशी वाजत-गाजत मिरवणूक काढून भावपूर्ण वातावरणात गौरी व गणपती बाप्पांना निरोप देण्यात आले.

फोटो
इको फ्रेंडली गणपती मखर सजावट श्री.अनंत खेडेकर यांच्या घरातील गणपती व मखर 

इकोफ्रेंडली गणेशोत्सव 


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा