श्रीवर्धन मध्ये बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी...


श्रीवर्धन : भारत चोगले
विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची चाहूल सर्वांनाच लागली आहे श्रीवर्धन तालुक्यात या उत्साहाची जोरदार तयारी सर्व स्तरातून सुरू झाली आहे . १३ तारखेला श्रीगणेश चतुर्थी असल्याने अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत . श्रीवर्धन शहरामध्ये शेकडो गणेशमूर्ती बनवून तयार झाल्या असून या मूर्तीवर रंगकामाचा अखेरचा हात फिरविण्यात मूर्तिकार मग्न झाले आहेत . ठिकठिकाणी सुबक आणि आकर्षक गणेशमूर्तीना सुदंर रूप द्यायचे काम सुरू आहे काही ठिकाणी रंगकामाचे काम पुर्ण झाले आहे . आता डोळयांच्या आखणीचे काम जोमाने सुरू आहे . या वर्षी रंगाचे , मातीचे दर वाढले असल्याने मुर्तीचे दरही वाढले असल्याचे गणेशमुर्तीकार यांच्याकडून सांगण्यात आले . दरवर्षी गणेशमूर्तीच्या संख्येत वाढ होत असल्याचेही सांगण्यात आले भक्तांच्या घरी गणराय येण्यासाठी सज्ज झाले असुन अगदी थोड्या दिवसांमध्ये गणरायाचे आगमन होणार आहे भक्तगणही आपल्या घरची साफसफाई , तसेच रंगरंगोटी करून आपले घर आर्कषक व स्वच्छ ठेवण्यासाठी मग्न झाला आहे गणराया घरी येण्याच्या आधी सर्वजण जय्यत तयारीला लागला आहे . शहरामध्ये व खेड्यांमध्ये तर शक्तीतुरऱ्याचे जंगी सामने व संगीत भजने रात्रौदिवस होत असतात . त्यासाठी लागणारे तबल्ला , टाळ , मुटुंग तसेच गणरायांच्या आगमानासाठी व विर्सजनासाठी मोठ मोठे ढोल ताश्या इत्यादी प्रकारचे साहित्य सामुग्री लागत असल्याने त्याची जमवाजमव करण्याचे काम ही जोरात सुरू आहे . गणरायाचा स्वागतासाठी सर्वच भक्तगण मोठया उत्साहाने तयारी करत आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा