म्हसळयांत खड्डयांच्या आंदोलनाने शासन त्रस्त
( म्हसळा प्रतिनिधी )
म्हसळा शहर व तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवासी, वाहतुकदार, पर्यटक कंटाळले असताना विविघ संघटना व संस्था आंदोलन करीत असताना शासन त्रस्त व खोटी अश्वासने देत आहे . याच वेळी
शहरातील मुसद्दीक ईनामदार व अन्य मंडळीनी खड्डे तात्काळ व ईदीपूर्वी बुजवावे नाही तर आंदोलनाला सामोरे जावे असा कडक ईशारा देत आज आंदोलन छेडून तहसीलदार, नगराध्यक्ष व C.E.O. ना निवेदन दिले. व शासनाला धक्का दिला.यावेळी ईनामदार यांच्या समवेत फहद मुंगअे,ईकबाल दाऊद पठाण, सलीम हुजुक, शाहीद उकये, किफायत पंडे, बावासाहेब जमादार, अ.शकूर घनसार, सुहेब हळदे,नावीद जंजीरकर, इम्रान दरोगे, सुजाउद्दीन काजी, हबीब काजी, सलीम बागकर, फारूक मेमन, सईद पेणकर,नहीम कादीरी, मिया दामाद,इरफान मुंग अे, जलील काजी, कवी म्हसलाई, महमद पठाण व सुमारे २०० कार्यकर्ते होते.
बांधकाम विभागाचा आभ्यास नसल्याने खड्डे जांभा दगडाच्या चिऱ्याने भरले जात आहेत . त्या खड्डयांमुळे जास्त चिखल , तळ पायाना गंभीर स्वरुपाच्या जखमा होत आहे, त्यातून उडणाऱ्या चिखलामुळे पादचारी व वाहन मालकांचे अनेक वेळा भांडण होत असते, भविष्यात शहरातील कायदा व सुव्यवस्थेत अडसर होण्याचे हे कारण ठरू नये.
-शाहीद ऊकये, म्हसळा.
२)शासनाने खड्डे तात्काळ भरावे भविष्यात येणाऱ्या बकरी ईदी पाठोपाठ हींदू धर्मीयांचे येणाऱ्या नारळी पोर्णिमा, रक्षाबंधन ह्या सारखे सण येत आहेत. त्यांचीही खड्डयांपासून मुक्ती व्हावी.
खड्डे बुजविण्याची पहीली जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. त्यानी येत्या २४ तासात न बुजविल्यास नगरपंचायत तात्काळ खड्डे बुजविण्यास समर्थ आहे.
-वैभव गारवे, Ceo, नगरपंचायत म्हसळा.


Post a Comment