म्हसळयात मोकाट गुरांनी केले तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलनमा ; मालक व प्रशासना विरुद्ध होते आंदोलन


प्रशासनाने गुरांचा प्रश्न हाताळण्यास  पळ काढल्याने  गणपतीपूर्वी करणार पुन्हा आंदोलन

( संजय खांबेटे, म्हसळा )

काल सायंकाळी ५वा . तहसील कार्यालयांत झालेल्या

शांतता सभेत म्हसळा शहरातील मुख्य रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतुक कोंडी, वाहनांची सातत्याने वाढणारी संख्या या अनुषंगाने पादचाऱ्याना मार्ग नसणे या विषयी उनाड गुरांबाबत फार गांभीर्याने चर्चा झाली . शहरातील व्यवस्था पहाणारी ग्रामपंचायत होती ती फार चांगली होती, अनेक पटीने टॅक्स घेणारी नगर पंचायत नको अशी टीका होत होती त्याच वेळी आमच्या जीवावर उठलेले मालक व प्रशासन व्यवस्था यांचे विरुध्द काही आभ्यासू गुरे एकत्र झाली. त्यांची प्रशासनाकडे एकच मागणी होती आम्हाला स्वार्थी पणाने सांभाळणाऱ्या आमच्या मालकांवर ,  आमचे हक्काचे निवासस्थानावर ( कोंडवाडा ) डल्ला मारणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करा, प्रथम प्राधान्याने आम्हाला उनाड सोडणाऱ्या आमच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी .

"महाराष्ट्र नगरपंचायत आधिनियम १९६५ च्या कलम २८३ प्रमाणे आम्हाला आमच्या हक्काचा कोंडवाडा द्यावा, कलम २८५ ( १ ) प्रमाणे आम्ही [ गुरे  ] नगरपालीका क्षेत्रावर किंवा सार्वजनिक मालमत्तेच्या जागी अतीक्रमण करीत  आसल्याचे आढळून आल्यास गुराना धरून कोंडवाडयात टाकणे पोलीस व नगर पंचायतीचे कर्तव्य आहे . त्या पद्धतीने कारवाई व्हावी"



 गुरानी दुकानांसमोर निषेध म्हणून विष्टा टाकलेली दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा