( म्हसळा प्रतिनिधी )
म्हसळा शहर व तालुक्यातील विविध रस्त्यांवरील खड्डे त्या अनुषंगाने शहरांतील व तालुक्यांतील विविध संघटना व राजकीय पक्ष आपापल्या पातळीवर व पध्दतीने आंदोलन छेडत आहेत, बहुतांश मागणी एकच आहे हिंदू- मुस्लीम धर्मीयांच्या सणापूर्वी शासनाने रस्त्याला पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे, त्यासाठी पावसाळी वापरण्यात येणारी डांबर वापरण्यात यावी कोणत्याही परीस्थितींत जांभा दगड वापरण्यात येऊ नये अशी जनतेतून मागणी होती परंतु सा.बांधकाम खाते खड्डे हेतू पुरस्कर जांभ्या दगडाने भरते याबद्दल जनतेतून नाराजीचा सूर आहे. तालुक्यात आजपर्यंत अवजड वाहतुक सेना, शिवसेना, रिक्षा चालक मालक संघटना व माजी सभापती महादेव पाटील, मुसद्दीक ईनामदार व कार्यकर्ते आशा विविध मंडळीनी खड्डयांबाबत आंदोलन , मोर्चा , निवेदन या लोकशाही संकेताच्या गोष्टी पार पाडल्या आसल्या तरी त्या विषयी M.S.R.D.C किंवा P. W.D. विशेष गांभीर्याने घेत नसल्याची जाणीव जनतेच्या व विविध संघटनांच्या लक्षांत आली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने खड्डे योग्य पद्धतीने न भरल्यास आंदोलक आपल्या आंदोलनाची आपली दिशा व स्वरूप बदलणार असल्याचे समजते.
शासकीय मंडळीना खुड्यांच्या कामात विशेष मलीदा मिळतो. साई चेकपोस्ट म्हसळा ते बायपास्ट व बायपास्ट ते ताज बेकरी या केवळ १४० मीटर रस्त्या साठी ठेकेदाराला शासनाने ३- ४ वर्षापूर्वी रु १ कोटी आदा केले . त्या रस्त्याला पडलेले खड्डे शासनाने ठेकेदाराच्या डिपॉझीट मधुन भरावे . माणगाव ते दिघी या रस्त्याचा दर्जा वाढला आहे. त्या रस्त्याचे खड्डे M.S.R.D.C. ने बुजविणे जरूरीचे आहे.
- महादेव पाटील . माजी सभापती पं.स., म्हसळा

Post a Comment